Type Here to Get Search Results !

पुणे जिल्हयात फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद;३ हजार २६९ नोंदी निर्गत, सहा महिन्यात १ लाख ५५ हजार नोंदी निर्गतीचे काम पूर्ण

पुणे जिल्हयात फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद;३ हजार २६९ नोंदी निर्गत, सहा महिन्यात १ लाख ५५ हजार नोंदी निर्गतीचे काम पूर्ण


पुणे, दि.29 : पुणे जिल्हयात कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे फेरफार अदालतीचे काम मार्चपासून बंद होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार चार महिन्यानंतर दि. 28 जुलै रोजी घेण्यात आलेल्या फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला. एका दिवसात ३ हजार २६९ नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत करण्यात आल्या. फेरफार अदालतीमधुन नोंदी निर्गतीचे काम आणखी दोन दिवस सुरु राहणार असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
नोंदी निर्गतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ऑक्टोबर २०२० पासून प्रत्येक मंडळाला संपर्क अधिकारी नेमण्याचे नियोजन करण्यात आले. नोंदी निर्गतीसोबत सातबारा संगणकीकरणामध्ये देखील पुणे जिल्हा प्रगतीपथावर आहे व ऑगस्ट अखेर संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
 पुणे जिल्हयात १ फेब्रुवारी २०१९ ते ३० जुन २०२९ अखेर ३१ लाख १२ हजार ५२५ सातबारा उतारे, १० लाख ३५ हजार ३१६ आठ अ उतारे व ३ लाख २७ हजार ६७८ फेरफार उतारे नागरिकांना ऑनलाईन वितरीत करणेत आले आहेत, तसेच माहे जानेवारी २०२१ ते जुन २०२१ अखेर ८ लाख ७६ हजार ८३२ सातबारा उतारे, ४ लाख ९ हजार २८२ आठ अ उतारे व १ लाख ३२ हजार २५० फेरफार उतारे ऑनलाईन वितरीत करणेत आले आहेत. त्यापोटी रक्कम रु. २ कोटी ५० लाख ८५ हजार २५५/- इतका महसूल जमा झाला आहे. पुणे जिल्हा राज्यात ७/१२, ८ अ व फेरफार वितरणामध्ये तिस-या क्रमांकावर आहे.
*तालुकानिहाय फेरफार नोंदी निर्गत*
*हवेली ३१६, पुणे शहर ५, पिंपरी चिंचवड १४५, शिरुर ४०८, आंबेगाव १६९, जुन्नर १७३, बारामती ४५२, इंदापूर ३१४, मावळ २३८, मुळशी ७१, भोर १०७, वेल्हा १३२, दौंड १९३, पुरंदर १५३, खेड ३९३ अशा एकूण ३ हजार २६९ अशी आहे फेरफार नोंदी निर्गतीचे काम पुर्ण करण्यात आले.* 
जानेवारी ते जुलै या कालावधी मध्ये १ लाख ५५ हजार ४३३ फेरफार नोंदी नव्याने घेण्यात आल्या असून १ लाख ५५ हजार ४२२ फेरफार नोंदी निर्गत देखील करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा फेरफार नोंदी धरुन घेणेच्या बाबतीत राज्यात दुस-या क्रमांकावर असून ९ लाख २३ हजार ९१७ फेरफार नोंदी घरलेल्या आहेत व त्यापैकी ८ लाख ९७ हजार ६६० (नामंजुरसह) फेरफार नोंदी निर्गत करणेत आल्या आहेत.
फेरफार निर्गतीचे प्रमाण अधिक वाढवणेकामी महिन्यातून दोनदा फेरफार अदालती घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत, यामुळे नागरिकांच्या फेरफार नोंदी तात्काळ निर्गत करण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test