Type Here to Get Search Results !

बारामतीतील करंजेपुल-विठ्ठलरायमाळ येथे ओपन जिमचे उद्घाटन..

करंजेपुल-विठ्ठलरायमाळ येथे ओपन जिमचे उद्घाटन..

सोमेश्वर नगर प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील करंजेपुल विठ्ठलरायमाळ येथे  कोरोनाचे सर्व नियम पाळत दि १८ रोजी मोकळ्या व प्रशस्त जागेत ओपन जिम चे उद्घाटन  पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.. या ओपन जिम मध्ये साधारण 10 प्रकारचे व्यायाम साहित्य असल्याने परिसरातील लहान मुले ,युवा पिढी व ज्येष्ठांनी याचा फायदा घ्यावा तसेच आपले शरीर ,आरोग्य सुदृढ  ठेवावे व ते समाज- देश सेवा करण्याकमी वापरावे असे बोलताना बांधकाम व  आरोग्य सभापती प्रमोद काकडे म्हणाले.

     या उद्घाटन प्रसंगी बारामती तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे,  सरपंच वैभव गायकवाड ,उपसरपंच निलेश गायकवाड,सोमेश्वर कारखान्याचे संचालक विशाल गायकवाड , तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत गायकवाड, मा. अध्यक्ष भानुदास गायकवाड, आजी-माजी सैनिक संघटनेचे बाळासाहेब शेंडकर ,ताराचंद शेंडकर, बाळु गायकवाड ,ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत शेंडकर,योगेश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test