साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे १०१ व्या जयंतीनिमित्त विचार जागर सप्ताहाचे आयोजन...
बारामती प्रतिनिधी
श्री मोरया प्रतिष्ठान मोरयानगर बारामती यांच्या वतीने
दरवर्षी प्रमाणे यावर्षी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा जागर सप्ताह १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१ दरम्यान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचारमंच या फेसबुक पेजवरून ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील विचारवंत अण्णा भाऊ साठे यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणार आहेत.
रविवार १ ऑगस्ट रोजी डॉ. अंबादास सगट,निवृत्त प्राचार्य यांचे अण्णा भाऊ साठे यांच्या दृष्टिक्षेपातील समाज,२ ऑगस्ट प्रा.विजय काकडे,विद्या प्रतिष्ठान कॉलेज बारामती
यांचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रातून होणारा बोध,३ ऑगस्ट प्रा.लक्ष्मणराव ढोबळे.(माजी उच्चशिक्षण व समाजकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील बंडखोर नायक,४ ऑगस्ट प्रा.प्रकाश नाईक,प्रा.श्री शिवशाहू महाविद्यालय सरूड जि.कोल्हापूर,५ ऑगस्ट प्रा.डॉ.देविदास वायदंडे,सिनेट सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे वैचारिक विश्लेषण,६ ऑगस्ट कॉम्रेड प्रा.अजित अभ्यंकर जैष्ठ विचारवंत यांचे आर्थिक व राजकीय विश्लेषक,७ ऑगस्ट प्रा.डॉ.मच्छिन्द्र सकटे,यांचे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि समतेचे राजकारण या विषयांवर व्याख्यान होणार आहे. श्रोत्यांना १ ते ७ ऑगस्ट रोजी दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत ऑनलाइन व्याख्यानाचा आस्वाद घेता येणार आहे.
या जागर सप्ताहाचे आयोजन डॉ.सुनिल लोखंडे,प्रा.नारायण खटके,प्रा.रामकृष्ण धालपे,मेजर प्रकाश काकडे,मेजर अनिल सकट,श्री.संतोष सुतार,तुकाराम यादव,हनुमंत गेजगे,शिवाजी निकम,प्रकाश खडके,सोन्ना(मामा)गादेकर,पंकज देशपांडे, शिवाजी करे,मोहन दळवी यांनी केले आहे.