बॅकेच्या बेजबाबदार पणामुळे ATM मधील 6 लाखाची चोरी प्रयत्न ;फोडण्यासाठी स्फोटकाचा वापर
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एम आय डी सी मधील एस बी आय बॅक च्या बाजुला SBI चे दोन ATM आहेत ... तर या इमारतीच्या आजुबाजुचा नेहमी अंधार असतो... झाडे झुडपे आहेत..रात्रीच्या वेळी येथे कोणीही सेक्युरिटी नसतो..त्यामुळे सदर ठिकाणी ची बॅंक व ATM ची असुरक्षित असल्याचे पेट्रोलिंग करणारे पोलिसांना नेहमी वाटत होते....हे जाणुन पोलीस उप निरीक्षक सुभाष मुंढे यांनी दि.3/6/2021 रोजी SBI बॅकेत जावुन मॅनेजर यांना भेटुन सदर बाबत लेखी पत्र देऊन लाईट ची व्यवस्था, सेक्युरिटी व CCTV बाबत लेखी सुचनेचे पत्र दिले होते ,
परंतु बॅकेने सदर सुचनेची काहीही पुर्तता केली नाही...
.... हे संधी पाहुन आज दि.18/7/21 रोजी अज्ञात चोरट्यांनी ए टी एम मध्ये स्फोट करून ए टी एम चे तुकडे करून सहा लाखाची चोरी केली... ...
ही चोरी होताना ATM च्या मुंबई नियंत्रण कक्षात दिसत असल्याने त्यांनी पुणे पोलीस कंन्ट्रोल मार्फत स्थानिक पोलिसांना कळविले.... नाईट राऊंड करिता असलेले PSI मुंढे व सहा.फोजदार शेख...चालक शिंदे , पो.काॅ.नाईक हे तत्काळ 5/7 मिनिटात पोहचल्याने त्याच्या सतर्कतेमुळे एका ATM मधील चोरी होण्याचे वाचले.... तर एका ATM मशिन मधील रू.5 लाख 75 हजार चोरी स गेले ....बॅका ATM ची जबाबदारी एजन्सी वर टाकुन हात झटकुन मोकळया होतात...यावरून दिसुन येते.त्यामुळे याचा नाहक त्रास प्रशासनावर येत आहे.या मुळे स्थानिक नागरिकांनी बँकेविषयी नाराजी व्यक्त केली.
घटनास्थळी मा.पोलीस अधिक्षक.डाॅ.अभिनव देशमुख यांनी भेट देवुन पाहणी केली असुन ए टी एम फोडण्यासाठी स्फोटकाचा वापर झाल्याचे आढळले आहे..पोलीस पथके तयार करून तपासाबाबत सूचना दिलेल्या आहेत. I car... BDDS टीम यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे ...
रक्कम ATM मशीन मध्ये सापडली आहे... BDDS टीम व बॅकेचे अधिकारी यांनी खात्री केली आहे
अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करत आहेत .