पुणे विभागातील 17 लाख 59 हजार 935 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 18 लाख 37 हजार 45 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 28 : पुणे विभागातील 17 लाख 59 हजार 935 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 37 हजार 45 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 39 हजार 312 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 37 हजार 798 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.80 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
*पुणे जिल्हा*
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 80 हजार 741 रुग्णांपैकी 10 लाख 53 हजार 156 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 419 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.45 टक्के आहे.
*सातारा जिल्हा*
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 15 हजार 531 रुग्णांपैकी 2 लाख 1 हजार 739 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 609 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सोलापूर जिल्हा*
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 74 हजार 574 रुग्णांपैकी 1 लाख 66 हजार 709 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 333 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 532 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सांगली जिल्हा*
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 71 हजार 900 रुग्णांपैकी 1 लाख 59 हजार 161 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 189 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कोल्हापूर जिल्हा*
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 94 हजार 299 रुग्णांपैकी 1 लाख 79 हजार 170 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 762 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 367 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 677 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 960, सातारा जिल्ह्यात 874, सोलापूर जिल्ह्यात 575, सांगली जिल्ह्यात 801 तर कोल्हापूर जिल्ह्यात 467 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
*कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण*
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 70 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 406, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 47, सोलापूर जिल्हयामध्ये 571, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 123 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 923 रुग्णांचा समावेश आहे.
*पुणे विभागातील सर्व्हेक्षण*
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 25 लाख 57 हजार 663 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 37 हजार 45 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 27 जुलै 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)