सोमेश्वर मंदिर परिसरात वृक्षलागवड करत हुंंबरे यांनी केला वाढदिवस साजरा..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी,
बारामती तालुक्यातील सोमेश्वर करंजे येथे सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योजक बुवासाहेब पंडितराव हुंबरे यांनी वाढदिवसाचा आनावश्यक खर्च टाळत प्रसिध्द सोमेश्वर मंदिर परिसरात वड, पिंपळ , चिंच , लिंब अशा ऑक्सिजन देणारी झाडे मंदिर परिसर सुशोभित दिसावे या संकल्पनेतून वृक्षारोपण केले ,
सोमेश्वरनगर भागातील सर्व स्तरातील ज्येष्ठ युवा व्यक्तींचा वाढदिवस 'झाडे लावा, झाडे जगवा अन् पर्यावरण वाचवा..!' या उपक्रमानुसार साजरा करावा असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले .
आज रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त बुवासाहेब हुंबरे यांनी एका चिंचेच्या झाडाला स्वखर्चातून पार बांधण्याचे नियोजन करून कामाचे भूमिपूजन श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप , बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे , रुई येथील आरोग्य अधिकारी ज्योती घोरपडे ,बारामती पंचायत समिती च्या सभापती नीता फरांदे ,मा सभापती अनिल खलाटे,वडगांव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, करंजेपुल चे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पत्रकार अँड. गणेश आळंदीकर ,संतोष हुंंबरे, सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे, सोमनाथ देशमुख , नितीन शेंडकर, अमोल फरांदे, प्रतीक्षा झणझणे,तानाजी भापकर, अनंत मोकाशी तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड,भाऊ हुंबरे यांच्या शुभहस्ते पारा चे भूमिपूजन झाले असून सोमेश्वर मंदिर परिसरात याच मान्यवरांच्या हस्ते बुवासाहेब हुंबरे यांच्या समवेत वृक्षरोपण कार्यक्रम ही संपन्न झाला.
सोमेश्वर मंदिर परिसरात झाडे लावल्याने सुशोभीकरण होऊन मंदिर परिसर सुंदर दिसणार असल्याने याचा मला आनंद आहे.असे हुंबरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या असणाऱ्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे व त्यांच्या सहकारी यांनी बुवासाहेब हुंंबरे यांच्या वाढदिवसाचे वृक्षारोपण व चिंचेच्या झाडाला पार बांधणे नियोजन केल.