आनंदाची बातमी;निंबुत येथील अजितदादा विलीगिकरण कक्ष ची रुग्ण संख्या झिरो.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुका सह सोमेश्वरनगर परिसरातील लोकसहभागातून सुरू केलेली कोविड सेंटर आता रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहेत.
बारामती तालुक्यातील असणारी माळेगाव, मोरगाव, सुपे,वाणेवाडी, निंबुत सर्वच कोविड सेंटर ठिकाणी अतिशय कमी रुग्ण संख्या आहे.
काही महिन्यापूर्वी बारामतीतील निंबुत येथे पाहिले अजितदादा विलीगिकरण कक्ष उभारण्यात आला होता. आज या ठिकाणी रुग्ण संख्या जिरो असल्याने
निंबुतकर यांनी समाधान व्यक्त करत त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
सोमेश्वरनगर परिसरात पुनश्या असे संकट आले तर पुन्हा निंबुतकर ग्रामस्थ त्याला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
निंबुत विलीगिकरण कक्षाला वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंटर मधून रोजचे जेवण जात होते. याबद्दल सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंटरचे मार्गदर्शक पुरुषोत्तम जगताप यांचा सत्कार निंबुत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक महेश काकडे, उदय काकडे,सुजित काकडे , बाळासाहेब काकडे, रणजित फरांदे, प्रमोद काकडे, सतीश काकडे, गणेश जगताप,जगन्नाथ जमदाडे, अमित काकडे ,विजय काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
..........................................................
अजितदादा विलगीकरण कक्ष निंबुत येथे असुन सध्या आजची रूग्ण संख्या शून्य आहे..इथून पुढे आपत्कालीन व भविष्यात येणाऱ्या संकटांना सामोरं जाऊन असे लोकसहभागातून संकटाला सामोरे जाण्याची तयारी ग्रामस्थांच्या वतीने महेश काकडे यांनी सांगितले