आज दिनांक १ जून रोजी लोणंद ते सालपा रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅक लगत आठ वर्षाची एक लहान मुलगी जखमी अवस्थेत स्थानिक लोकांना मिळून आली होती. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार मिरज रेल्वे पोलीस स्टेशन कडील पीएसआय तारडे व त्यांचा स्टाफ तसेच तसेच आरपीएफ सातारा कडील स्टाफ असे घटनास्थळी ताबडतोब पोहोचले. जखमी मुलीची अवस्था पाहता तिला उपचारांकरिता सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे ताबडतोब दाखल करण्यात आले. त्यावेळी मुलगी स्पष्ट बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे आणल्यानंतर तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. त्यावेळी त्या मुलीने डॉक्टरांना सांगितले की मी माझे आई वडील भाऊ बहीण असे गोवा इथून दिल्ली कडे जाणे साठी रेल्वेने काल गोव्या मधून निघालो होतो. रात्री जेवण करून झोपले होते. मी वरच्या बर्थवर झोपले असताना रात्री उशिरा मला एका अनोळखी व्यक्तीने उचलून बाथरूममध्ये नेले. त्याठिकाणी त्याने माझ्या अंगावरचे कपडे काढत असता मला त्यावेळी अचानक जाग आली. मी आरडाओरडा केला. तेव्हा त्या व्यक्तीने मला आई-बाबा कडे नेतो असे म्हणून म्हणून रेल्वेच्या या दरवाजातून मला बाहेर फेकून दिले.
अशा पद्धतीने डॉक्टरांना तिने माहिती दिली आहे. सदरची माहिती समजताच मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे कडील स्टाप एलसीबी लोहमार्ग पुणे तसेच आरपीएफ सातारा यांचेकडील स्टाफ यांनी मुलीने सांगितले वर्णनानुसार या व्यक्तीचा शोध घेऊन शोध घेऊन त्या इसमास भुसावळ रेल्वे स्टेशन येथे उतरून घेण्यात आले. त्या इसमास ताब्यात घेतल्यावर त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.
संशयित इसमाचे नाव — प्रभू मल्लाप्पा उपहार वय 33 वर्षे धंदा- आर्मी मधे नाईक. पोस्टिंग – युनिट 182 झांशी. मुळ राहणार मु. संगळ पोस्ट सुगमधूर जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक आहे. सध्या पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर पुढील उपचार सातारा सीव्हील येथे सुरू आहेत.