मोरगाव गावठाण हद्दीत आजपासून बाराही महिने चोवीस तास थ्री-फेज वीजपुरवठा सुरू होणार : निलेश केदारी
मोरगाव प्रतिनिधी
मोरगाव ता .बारामती येथील गावठाण हद्दीत आजपासून बाराही महिने चोवीस तास थ्री-फेज वीजपुरवठा सुरू होणार आहे . याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांकडे येथील सरपंच निलेश केदारी यांनी पत्रव्यवहार करून मागणी केली होती . थ्री फेज विजपुरवठ्यामुळे येथील व्यवसाईकांची विजेबाबतची समस्या कायमची मिटणार आहे .
मोरगावचे अष्टविनायकापैकी प्रथम तीर्थक्षेत्र असल्याने येथे देश- देशविदेशातुन अनेक व्हीआयपी व्यक्तींसह , मोठ्या संख्येने भक्तगण येत असतात . तसेच येथे फर्निचर , ट्रक्टर ट्रॉली बांधणी कारखाना , गारमेंट्स , लॉजींग आदी अडीचशे पेक्षा अधीक व्यवसाईक आहेत . यामुळे सरपंच निलेश केदारी यांनी सुमारे सहा महिन्यापूर्वी अजित पवार यांकडे मयुरेश्वर मंदिर व गावठाण हद्दीमध्ये चोवीस तास थ्री फेज वीजपुरवठा सुरू होण्याबाबात दिले होते .
त्यानुसार आज मोरगाव येथे अतीरीक्त दोन अतीरीक्त विज रोहीत्राची उभारणी केली आहे . त्यावर परिसरातील शेती पंपाचा अधिभार जोडून गावठाणामध्ये थ्री फेज वीजपुरवठ्याची जोडणी वेगळी केली असल्याची माहीती विज वितरण कंपनीचे साहाय्यक अभीयंता अभीयंता दिलीप नाळे यांनी दिली आजपासून बाराही महीने गावठाणात चोवीस तास थ्री- फेज विज सुरु राहणार आहे .