बारामतीतील कोऱ्हाळे बु गावच्या युवा सरपंचांचा पावसाळी विकास कामांचा धडाडा...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती (दि.३जून) कोऱ्हाळे बु गावतील युवा सरपंच रविंद्र खोमणे यांनी सरपंच पदी विराजमान झाल्यापासून अनेक विकास कामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे पावसाळी वातावरण बघता त्यांनी आता पावसाळी विकासकामांकडे लक्ष वळले आहे, जिल्हा परिषदेच्या पावसाळ्या पूर्वी गावातील नाले सफाई, गाव स्वच्छता, एक कुटुंब एक शोष खड्डा या योजने अंतर्गत नाले सफाई चालू केली आहे,
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शेजारील नाले सफाईचा कार्यक्रम करण्यात आला या कामाचा शुभारंभ श्री. प्रदीप धापटे(पंचायत समिती सदस्य) कोऱ्हाळे बु गावतील युवा सरपंच रविंद्र खोमणे यांनी व दिलीप खोमणे मा.सरपंच, पोलिस पाटील शरद बापू खोमणे तसेच गावचे तंटामुक्ती अध्यक्ष.डी. के. आबा खोमणे यांनी नारळ फोडुन केली.
या कार्यक्रमाला राजेंद्र पवार(ग्रामपंचायत सदस्य) दासा खोमणे, ग्रामसेवक-शिंदे भावसाहेब.पी.एस.माकर(विस्तार अधिकारी बारामती) श्री. राहुल भगत श्री.प्रतिक चव्हाण, कल्याण माळशिकारे, ग्रामपंचायत कामगार राहुल चव्हाण व रवि माळशिकारे, दत्ता नलवडे इ. उपास्थित होते.
या कामासाठी कल्याण माळशिकारे यांनी JCB उपलब्ध करून दिला.