इंदापुर हद्दीत हायवे रोडवर लोंकाना अडवुन लुटमार करून दरोडा टाकणारे पवार टोळीवर मोक्का अंतगत कार्यवाही
इंदापुर प्रतिनिधी
इंदापूर पोलीस स्टेशनचे हृद्दीमध्ये राहुल बाळासाहेब पवार, गणेश बाळासाहेब पवार व त्याचे साधीदार हे जवळपास गेले आठ ते दाहा वर्षोपासुन वेगवेगळे गुन्हे करीत असत त्याचेवर २०११ पासुन वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. सन २०११ साली सदर टोळीने लाकडी हॉकीने डोक्यात मारहान करून मोठी दुखापत करून भांडणे केली होती भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या इतर लोंकाना ही हाताने लाथाबुक्याने मारहान केली होती त्या बाबत गुन्हा दाखल आहे २०१४ साली समोर लावल्याली एक पियाजो रिक्षा स्वताचे फायदया करीता संमती शिवाय चोरी करून चोरून नेहली होती ,२०१५साली पवार टोळीने बेकायदेशिर जमाव जमवुन गणपती विसर्जन मिरवणुकीचे कारणावरून दंगल करू दगडाने ,विटाने ,लाथाबुक्याने तसेच फायटरणे मारामारी करून गोधळ केला होता ,२०१६ साली पवार टोळी हि दुकान दारानां धमकावुन दुकान चालवायचे असेल तर आम्हाला पैसे खंडणी दयावी लागेल असे म्हणुन
पवार टोळीने खंडणी दिली नाही म्हणुन दुकानाच्या काचा फोडुन दुकानातील गल्लयातील पैसे कादुन घेत असले बाबत गुन्हे दाखल आहे ,२०१७ साली पवार टोळीने इंदापुर येथील
यात्रे मध्ये पाळण्यात बसण्याचे कारणावरून जातीवाचक अपशब्द वापरून कोयत्याने मारहान करून रिव्हॉलव्हर रोखुन गोळयाच घालीन अशी धमकी देवुन दहशत करून लाथा बुक्याने मारहान करून जिवे ठार माण्याचा प्रयल्न केला आहे पवार टोळीने इंदापुर येथील मेडीकल दुकाने फोडुन घरफोडी चोरी करून मेडीकल दुकानामधील संगणक,रोख रक्कम ,मोबाईल हॅन्डसेट तसेच वेगवेगळया प्रकारची औषधे
चोरी केली आहेत ,२०२० साली पवार टोळीने वेकायदेशिर जमाव जमबुन खुनाचा प्रयत्न ,कोयत्याने मारहान करून लाकडी दाडक्याने मारहान करून जिवे मारण्याचा प्रयत्न
केला आहे सदर अडवुन वाट सरूचे हातातील घडयाळ व वाटसरूचे पैसे जवरीने काढुन घेवुन मारहान करून दरोडा टाकला आहे, सदर पवार टोळीने रिक्षाचा वापर करून गोर गरीब शेतकरी यांचे शेळया दरोडा टाकुन चोरून नेहले आहेत असे पवार टोळीवर दरोडा घालने खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, अवैदय सावकारी जवरी चोरी, घरफोडी चोरी,मारामारी असे गुन्हे दाखलआहेत, २०१८ पवार टोळीने अकलुज रोडने जाणारे वाटसरू यांना मो सा. व रिक्षाने चोरी सदर पवार टोळीने तारीख १३/०५/२०२१ रोजी पहाटे ०५:३० वा. चे.सुमारास फिर्यादी हे त्याचे मो.सा.वरून पुणे सोलापूर हायवेवर हिंगणगाव गावचे जवळ असनारे सोनाई पेट्रोल पंपाजवळ एम. एच. १२/बी. पी. ४३४५ या इंडिका कारमधील पाच इसमांनी फिर्यादीचे मो. सा. ला त्याची इंडिका कार आडवी लावुन तु आम्हा कट का मारला असे म्हणुन कोयत्याने मारहाण करून फिर्यादीचे जवळील रोख रक्कम मोबाईल ,पाकीट ,आधारकार्ड असे जबरीने हिसकावून दरोडा टाकला आहे. असुन
त्याबाबत इंदापुर पो. स्टेशन येथे गु. रजि. नं. ४४०/२१ भ. द. वि. कलम ३९५ वगैरे
प्रमाणे दाखल आहे,सदर दाखल गुन्हयाचे अनुशंगाने तपास करीत असताना यातील फिर्यादी यांनी फिर्यादी दिलेल्या वर्णनाप्रमाणे तसेच दरोडा घालणारे लोक यांचे ताब्यातील इंडिका कार नं. एम.एच. १२/बी.पी. ४३४५ बाबत तसेच आरोपीचे वर्णन प्रमाणे तपास करीत
असताना पायल सर्कल येथे नाकाबंदी दरम्यान सदर गुन्हयात वापरलेली इंडिका कार नं इंडिका कार नं. एम.एच. १२/बी.पी. ४३४५ ही दिनांक १३/५/२०२१ रोजी मिळुन आली असुन कार मध्ये अ.नं. १ ) राहूल बाळासाहेब पवार, वय २२ वर्षे, रा. इंदापूर,ता. इंदापूर,जि.पुणे यांचे कडे सखोल तपास करता त्याने त्याचे साथीदार नामे २) पिनेश उर्फ दिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईजे, ३) विवेक पांडुरंग शिंदे, ४) सागर नेताजी बाबर असे एकुण ४ जण मिळुन आल्याने त्यांना पो स्टे येथे आणुन त्यांचेकडे गुन्हयाबाबत तपास करता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन त्याचे बरोबर गुन्हा करते वेळी आणखीन एक साथीदार नामे गणेश बाळासाहेब पवार रा.इंदापुर असे असल्याचे सांगीतले आम्ही सदर
वरील टोळीतील आरोपीची खात्री केली असता सदरचे आरोपी हे रेकॉडवरील असल्याचे निष्पन्न झाले आहे .सदर पवार टोळीतील १) राहूल बाळासाहेब पवार २)गणेश बाळासाहे पवार
३)पिनेश उर्फ दिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईजे, ४)विवेक पांडुरंग शिंदे,५)सागर नेताजी
बाबर यांचेवर आतापर्यंत एकुन ११गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन त्यांनी खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे , अवैदय सावकारी ,जबरी चोरी , घरफोडी चोरी, चोरी ,मारामारी
असे गुन्हे दाखल असे गुन्हे संघटीत पणे केले असुन या वेळीस सदर टोळीला कायदयाचा फास आवळण्याचे कडक आदेश हे मा.अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी दिल्याने मा.धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक इंदापुर यांनी पवार टोळीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्याचे ठरविले मा. मनोज लोहीया विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर यांचे कडे मा.अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रा. मा. मिलींद मोहिते अपर पोलीस अधिक्षक मा.नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांचे मार्गदर्शनानुसार पवार टोळीवर मोक्का अर्तगत प्रस्ताव कार्यवाही केली असुन सदर ची पवार टोळी हि सध्या जेल मध्ये असुन सदर मोक्याचा तपास मा. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो बारामती विभाग बारामती हे करीत आहे त्यानुसार बारामती तसेच मा..धन्यकुमार गोडसे पोनि.इंदापुर पो.स्टे.यांनी सांगतले कि यापुढे हि
अशाच प्रकारची कडक कार्यवाही इतर गुन्हेगारावर करण्यात येणार असुन वाळु चोरावर हि लवकरच मोक्का सारख्या कडक कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच येत्या काही काळात वाळु चोर हे जवळपास २५ वाळुचोर हे तडीपार करणार आहे असे सांगितले आहे सदरची कार्यवाही हि मा.अभिनव देशमुख सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रा. मा.मिलींद मोहिते साो अपर पोलीस अधिक्षक बारामती,मा.नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग,मा.धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक इदापुर,स.पो.नि.धनवे,स.पो.नि.लातुरे, पो.स.ई धोत्रे,सहा.फौज.जगताप (L-C-B) सहा.फौज.ठोबरे,सहा. फौज.तांबे पो.हवा.दिपक पालके,पो.ना.संजय जाधव, पो.ना.विनोद पवार पो.ना.मोहिते,पो.ना.मोहळे ,पो.का.केसकर, पो.काँ. गारूडी पो. का. विकम जमादार , पो. काँ.मोरे ,यांनी केली आहे.