शिवस्वराज्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने
तालुक्यातील ग्रामीण भागात उत्साहात साजरा
मोरगांव प्रतिनिधी
रविवार दि ६ रोजी ग्रामपंचायत श्री क्षेत्र मोरगाव सह , तरडोली , आंबी , मुर्टी , लोणी भापकर , या ठिकाणी शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शिवरायांच्या नावाचा जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली.
आज शिवस्वराज्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने तालुक्याच्या ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण पसरले होते . ग्रामपंचायतीच्या वतीने हा सोहळा पहील्यांदाच संपन्न झाला. यावेळी मोरगांव येथे सरपंच निलेश केदारी,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक मोरेश्वर गाडे, शिक्षक वृंद व समस्त शिवप्रेमी उपस्थित होते. तर तरडोली येथेही गुढी उभारण्यात आली . याप्रसंगी सरपंच नवनाथ जगदाळे , उपसरपंच महेंद्र तांबे , ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव , अश्विनी गाडे , अनिता पवार , स्वाती गायकवाड , विद्या भापकर ,बबाबाई धायगुडे ,संतोष चौधरी , ग्रामसेवीका रुपाली मेह्त्रे , सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भापकर , माजी सरपंच संजय भापकर आदी उपस्थित होते .
मोरगांव येथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरपंच केदारी यांनी सांगितले शिवरायांचे विचार प्रत्येक व्यक्तीने आचरणात आल्यानंतर त्याचा उपयोग उत्कृष्ट समाज कार्यासाठी , उत्तम राजकारणासाठी नक्कीच होइल . आज तरडोली येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने जागतिक पर्यटन पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार संगीता भापकर यांना , बेसबॉल स्पर्धेत उत्तुंग यश मिळवून गावचे नाव लौकिक केलेल्या रेश्मा पुणेकर व कोंदण काव्य संग्रह लिहलेल्या नामांकित कवयत्री विद्या जाधव , युवती कृषी पदवीधर पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झालेल्या पुर्वा जाधव , दोन बायपास सर्जरी होऊन कोरोनावर मात करणारे वयोवृद्ध किसन भापकर , सामाजिक कार्यकर्ते प्रा .संतोष तांबे , व जेष्ठ नागरिक विठ्ठल शिंदे यांचा मन्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.