ग्रामपंचायत पिंपळी लिमटेक च्या वतीने शिवराज्यभिषेक दिन,शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला.
बारामरती प्रतिनिधी
इतिहासातील सुवर्णसोहळा म्हणून ओळखला जाणारा शिवराज्याभिषेक दिन आज ग्रामपंचायत पिंपळी- लिमटेक च्या प्रांगणात शिवस्वराज्यदिन शिवशक राजदंड "स्वराज्य गुढी" उभारून साजरा करण्यात आला.
शिवराज्याभिषेक प्रतिमेला व स्वराज्य गुढीस सरपंच मंगल केसकर व उपसरपंच राहुल बनकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवर,शिक्षक आदींनी याठिकाणी राष्ट्रगीत,महाराष्ट्र गीत,शिवगीत गाऊन अभिवादन केले.
याप्रसंगी सरपंच मंगल हरिभाऊ केसकर पिंपळी लिमटेक गावात विविध विकासात्मक उपक्रम राबवून गावातील वाद तंटे मिटवुन शिव स्वराज्य निर्माण करण्याचा सर्वस्वी प्रयत्न करू असे प्रतिपादन करून सर्वांना शिवस्वराज्यभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मंगलमय दिवस म्हणजे ६ जून १६७४ यादिनी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि शिवाजी राजे 'छत्रपती' झाले. आजपासून दरवर्षी ६ जून हा दिवस शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आल्याचे छत्रपती सहकारी कारखान्याचे संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी सांगितले व प्रतिमेस पुष्प अर्पण करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
बारामती संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य सुनिल बनसोडे बोलताना म्हणाले जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे, रयतेचे सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून शिवराज्याभिषेक दिन हा केवळ सार्वजनिक ठिकाणी साजरा न होता घराघरात एक सण-सोहळा म्हणून साजरा व्हावा व रयतेचे राज्य यावे.
यावेळी छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन भाऊसो भिसे,सरपंच मंगल केसकर, उपसरपंच राहुल बनकर, संजय गांधी बारामती निराधार योजना समितीचे सदस्य सुनिल बनसोडे,पोलीस पाटील मोहनराव बनकर,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, तलाठी तेजस्वी मोरे, ग्रा.पं.सदस्य आबासो देवकाते, अजित थोरात, उमेश पिसाळ,वैभव पवार, ग्रा.पं.सदस्या स्वाती ढवाण,अश्विनी बनसोडे, कोमल टेंबरे, मंगल खिलारे, मिनाक्षी देवकाते,श्रीराम सोसायटीचे अशोकराव ढवाण पाटील,विविध विकास सोसायटीचे अशोकराव देवकाते पाटील,आरोग्य सेवक राहुल घुले,ग्रामपंचायत सहायक अनिल बनकर,पिंपळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक केशव आगवणे सर, शिक्षक व शिक्षिका, अंगणवाडी सेविका,तालुका संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष विजयसिंह बाबर,शेतकरी तालुका संघटनेचे विकास बाबर, ग्रामस्थ हरीभाऊ केसकर,पप्पू टेंबरे,खंडू खिलारे,महेश चौधरी, कालिदास खोमणे, बापूराव केसकर, नितीन देवकाते, सूर्यकांत पिसाळ, सोना देवकाते, तुषार थोरात,पप्पू बाबर, कल्याण राजगुरू, रमेश देवकाते आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
शिवघोषणा देऊन पप्पू बाबर यांनी परिसर शिवमय करून टाकला तर अशोकराव ढवाण पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून सर्वाना शिवस्वराज्यभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.