Type Here to Get Search Results !

अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून“कार्य हीच ओळख फाउंडेशन”चा गौरव

अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून
“कार्य हीच ओळख फाउंडेशन”चा गौरव

 पर्यावरण,जलसंधारण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल बारामती येथील कार्य हीच ओळख फाउंडेशनचे अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.८ जुन २०१८ रोजी ‘कार्य हीच ओळख फाउंडेशन’ ची  स्थापणा करून वृक्षारोपण,जलसंधारण,आरोग्य व रक्तदान शिबीर,किल्ले स्पर्धा,वाचनालय,कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य हीच ओळख फाउंडेशने दखलपात्र कार्य केले आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात अनेक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, त्याचबरोबर समाजातील विविध घटकांना जीवनावश्यक साहित्य वाटप असे विविध उपक्रम आपली संस्था समर्थपणे राबवत आहे.तसेच वृक्षारोपण व त्यांचे संगोपण अशा उल्लेखनीय कार्याची मंगळवारी (दि. ८) अस्मिता माईंड क्लिनिकचे संचालक (संमोहन उपचार केंद्र),अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ.विजयकुमार काळे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर बनकर यांना सन्मानपञ देण्यात आले.यावेळी रविकुमार काळे, सोनाली खाडे, गुनश्री रासकर, अक्षय धुमाळ,संदिप बनकर उपस्थित होते.
——————————————————————
‘कार्य हीच ओळख फाउंडेशन’ च्या माध्यमातून आजवर विविध विधायक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी कडक उन्हाळ्यात पक्षांची धान्य-पाण्याची सोय होण्यासाठी ‘मुठभर धन्य,घोटभर पाणी’ ही संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून सुरू केली. संस्थेच्या ‘हरित वृक्ष बन’ या संकल्पनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करणे आणि त्याचे संगोपन करण्याचे काम केले जात आहे.
————————————————
डॉ.विजयकुमार काळे यांच्या हस्ते ‘कार्य हीच ओळख फाउंडेशन’ला सन्मानपञ देण्यात आले.

अस्मिता माईंड क्लिनिकचे संचालक (संमोहन उपचार केंद्र),अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष
डाॅ.विजयकुमार काळे यांचे विशेष आभार.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test