बारामतीतील बाजारपेठा पुन्हा सुरू; व्यापारी वर्गाला दिलाचा - नियम पाळणे गरजेचे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रदूषणामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून सर्वत्रच व्यापारी बाजारपेठ बंद होती तर ही बाजारपेठ मंगळवार दिनांक ८ रोजी पासून सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सुरू राहणार आहे असे शासन पत्रकात म्हटले आहे तर दिलेल्या माहितीनुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहे
बारामतीतील सर्व प्रकारची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
थोडक्यात बारामतीतील संपूर्ण बाजारपेठ दुपारी 1 पर्यंत सुरू राहणार तर अत्यंत आवश्यक सेवा सरकारने ठरवून दिलेल्या वेळेनुसार म्हणजे दुपारी चार पर्यंत सुरू राहणार आहे
व्व्यापारी वर्गाने दुकान खुली असताना शासनाने दिलेल्या नियमानुसार व कोरोना
प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरणे,सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे कोणीही हलगर्जीपणा करू नये विशेष ग्राहक,मालक यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.