संगीता किरण आळंदीकर यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा कोविड सेंटर वाणेवाडी येथे १० हजार रु.रक्कमचा दनादेश भेट..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपूल येथील पुनम ज्वेलर्स ( आळंदीकर सराफ ) च्या संचालिका संगीता किरण आळंदीकर यांनी आपल्या त्यांच्या पतीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिलेली १० हजार रु.रक्कम अजितदादा कोविड सेंटर वाणेवाडी (ता बारामती) येथे दिली.या रकमेचा धनादेश त्यांनी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे कडे आज सुपूर्द केला.
या वेळी इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन चे राज्य समन्वयक किरण आळंदीकर,पत्नी संगीत आळंदीकर, पूनम ज्वेलर्स चे कार्यकारी संचालक शुभम आळंदीकर,बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, युवा नेते गौतम काकडे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला सरचिटणीस सुचिताताई साळवे पत्रकार महेश जगताप, विनोद गोलांडे, तुषार धुमाळ
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे कडे आज सुपूर्द करते वेळी उपस्थित होते.
कुटुंबातील सर्वांचे वाढदिवस साध्या पद्धतीने साजरे करून त्या दिवशी गरजूंना मदत करतो ,मी देखील दर वर्षी माझा वाढदिवस मुर्टी येथील प्राजक्ता मतिमंद मुलांच्या आश्रम शाळेत त्या मुलांना सोबत घेऊन त्यांना खाऊ देऊन साजरा करीत असतो.
काही वर्षांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्या सुविध्य पत्नी सुनेत्राताई पवार हे आमच्या घरी कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते त्यावेळी बोलताना आमच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून म्हणाले होते की ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या उत्पन्नातील किमान १० टक्के हिस्सा सामाजिक कार्यासाठी, गरजूंना मदत म्हणून खर्च केला पाहिजे
------शुभम आळंदीकर----
..ती प्रेरणा घेऊन आम्ही कुटुंबीय शक्य होईल तेवढे सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करतो असे किरण आळंदीकर यांनी सांगितले .