बहुद्देशीय संस्था भारत यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील दहा गावांत जागतिक वृक्षारोपण करत पर्यावरण दिन साजरा
तरडोली नजीक पवारवाडी येथे वृक्षारोपण करताना तालुकाध्यक्ष मंगेश खताळ
मोरगाव प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था भारत यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील दहा गावांत वृक्षारोपण करण्यात आले . वड , कडुलिंब अशी पर्यावरण पुरक झाडे लावण्यात आली .
आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तालुक्याच्या पश्चिम भागातील माळेगाव , उंडवडी , अंजनगाव , बाबुर्डी , पणदरे ,पळशी ,काटेवाडी ,लोणी भापकर , सांगवी , तरडोली येथे झाडे लावण्यात आली . पर्यावरणास पुरक अशी वड , करंज , कडुलिंब या झाडांचे वृक्षारोपण केले . वरील गावांमध्ये दोनशेपेक्षा अधीक झाडांचे वृक्षारोपण करुन संस्थेच्या कार्यकत्यांकडुन त्यांचे संगोपन व संवर्धन करण्यात येणार आहे .
तरडोली येथे वृक्षारोपण बारामती तालुका पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष मंगेश खाताळ यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबासो पवार, माजी सरपंच जालिंदर गरुड, भाऊसाहेब कोळेकर,
विकास पवार, निलेश पवार, सचीन गारडे , आप्पा पवार, दादासाहेब पवार ,शैलेंद्र तोंडे व महेश खोमणे आदी उपस्थित होते . गावातील तरुणांना आपल्या अंगणात , परीसरात झाडे लावायची असल्यास मोफत दिली जाणार असल्याचे यावेळी खताळ यांनी सांगितले .