Type Here to Get Search Results !

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज 9 जून 2021 पासून सुरू

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज 9 जून 2021 पासून सुरू
बारामती प्रतिनिधी

कोवीड – 19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी, शासनाच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती  येथील कामकाज स्थगित ठेवण्यात आले होते.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , बारामती येथील कामकाज दिनांक 9 जून 2021 रोजी पासून सुरू करण्यात येत आहे. परंतु गर्दी टाळण्याच्या हेतूने मर्यादीत स्वरूपात कामकाजास सुरूवात होणार आहे.

त्यामध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती दिवसाला 40 , पक्की अनुज्ञप्ती दिवसाला 40, अनुज्ञप्ती नुतनीकरण व अनुज्ञप्तीविषयक इतर कामकाज दिवसाला 25 अर्ज, योग्यता प्रमाणपत्र (सी.एफ.आर.ए) दिवसाला 27, वाहन हस्तांतरण, वाहनावर बोजा चढवणे, उतरवणे व इतर कामकाज (परिवहनोत्तर विभाग) दिवसाला 30 अर्ज, वाहन हस्तांतरण, वाहनावर बोजा चढवणे, उतरवणे व इतर कामकाज(परिवहन विभाग) दिवसाला 15 अर्ज या प्रमाणे कामकाज सुरू राहील असे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test