सर्वांना मोफत लस, दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत धान्य!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. येत्या 21 जूनपासून देशातील 18 वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल. केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार 80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत राशन पुरवणार असल्यांच मोदींनी नमूद केलं.
ज्या लोकांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना पैसे देऊन लस घेता येईल. मात्र खासगी रुग्णालये 150 रुपये अतिरिक्त चार्ज लावूनच लस देऊ शकतात. या किमतीवर नियंत्रण राज्य सरकारांनी ठेवावं, असंही मोदीजी म्हणाले.