मोरगाव येथे शिवभोजन थाळीची सुरवात : दररोज १०० व्यक्तीना मिळणार थाळी
मोरगाव ता . बारामती येथे शिवभोजन थाळीचे उद्घाटन करताना तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व ईतर
-------------------------------------------------
मोरगाव प्रतिनिधी
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव तालुका बारामती येथे आज शिवभोजन थाळीचे शुभारंभ झाला . या भोजन थाळीचे उद्घाटन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर व माजी सभापती अमृता गारडे यांच्या हस्ते करण्यात आले .
समाजातील गोरगरीब लोकांना अन्न मिळावे उपासमार होऊ नये यांसारख्या अनेक उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवभोजन थाळीची महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरुवात करण्यात आलेले आहे .बारामती तालुक्यातील मोरगांव हे अष्टविनायकापैकी प्रथम तीर्थक्षेत्र आहे . यामुळे येथे भावीकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते . येथे शिवभोजन थाळी सुरु होण्याबाबत आखिल भारतीय समता परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल लडकत यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार व अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता
. यांस मान्यता मिळाली असून याचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर व पंचायत समीती बारामतीचे माजी सभापती अमृता गारडे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी बारामती मार्केट कमीटी सभापती वसंत गावडे ,मोरगावचे सरपंच निलेश केदारी , मा . जिल्हा परीषद सदस्य ज्ञानेश्वर कौले , समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत , राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे , रोहीदास कुदळे , शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्ता लोणकर , माजी सरपंच दत्तात्रय ढोले , व्यंकटेश एंटर प्रायजेसचे प्रसाद नाळे ,सचीन भुजबळ , मनोज कौले आदी उपस्थित होते .आजपासून सकाळी ७ ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व गोरगरीब व गरजू व्यक्तींना शासनाच्यावतीने पुढील आदेश येईपर्यंत विनामूल्य भोजन दिले जाणार जाणार असल्याची माहिती या वेंकटेश्वरा इंटरप्राईजेसचे सर्वेसर्वा प्रसाद नाळे यांनी दिली.