जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती साजरी
पुरंदर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कुलदैवत तथा होळकर घराण्याचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती शासन नियमानुसार व सोशल डिस्टिंगचे पालन करत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली .यावेळी जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने गडावर उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी माजी नगरसेवक संपत कोळेकर, खाजगी देवी अहिल्याबाई होळकर चॅरीटिज ट्रस्ट जेजुरी चे मॅनेजर रमेश लेंडे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत पडळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष संतोष खोमणे, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी उत्तम लेंडे,बेलसर गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश बुधे, महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेच्या तालुका कार्याध्यक्ष ऐश्वर्या लेंडे, पोलीस काॅन्सटेबल निता दोरगे, मनिषा कुतवळ, आदि मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, देवस्थानच्या वतीने शिपाई बापु खोमणे,अक्षय गोडसे, शिवाजी थोरात तसेच होमगार्ड सुनिल शेंडगे, राहुल थिकोळे आदिनी सहकार्य केले जयंतीचे औचित्य साधून गडावर उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याबद्दल श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त साॅलिसीटर प्रसाद शिंदे, विश्वस्त शिवराज झगडे,पंकज निकुडे पाटील, संदिप जगताप,ॲड. अशोक संकपाळ, तुषार सहाणे, राजकुमार लोढा, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, आदिंना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले