"सोमेश्वर आयसीयु हॉस्पिटल" चे आणखी एक यश;
८६ व ७९ या वयाच्या दाम्पत्यांनी केली कोरोनावर मात
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील गेले दहा दिवस सोमेश्वर हॉस्पिटलमध्ये (वाघळवाडी-सोमेश्वरनगर) सुधाकर सामंत वय ८६ वर्षे आणि त्यांच्या पत्नी वसुधा सामंत वय ७९ वर्षे हे कोविड19 मुळे दाखल होते. दोघांचाही HRCT स्कोअर 8 होता, दोघानाही बीपी किंवा शुगर चा त्रास नव्हता पण वय लक्षात घेता त्यांना ऑक्सिजन सपोर्ट देण्याचा निर्णय नातेवाईक आणि डॉक्टरांनी घेतला. सोमेश्वर हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि संपुर्ण टीम ने घेतलेली काळजी, केलेले योग्य उपचार यांनी दोघेही एकदम ठणठणीत झालेत, यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे दोघांचीही जीवट इच्छाशक्ती आणि एकमेकांवरचे प्रेम. आजोबा सामंत यांना दोन दिवस आधीच डिस्चार्ज दिला असता पण त्यांचा निर्धार होता की, "जाईन तर वसुधासोबतच", आणि खरंच ते पुढचे दोन दिवस आज्जीसोबत दवाखान्यातच थांबले. आज सोमवार दि १७ रोजी संध्याकाळी दोघांना डिस्चार्ज देताना डॉक्टर्स आणि सगळा स्टाफ ही त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी एकमेकांना सांगत होता.
घरी जाताना दाम्पत्याने सोमेश्वर आयसीयू चे प्रमुख डॉक्टर अनिल कदम,डॉ सूरज सोनलकर आणि डॉ शुभम गाडेकर यांच्या अधिपत्याखाली दिलेल्या सेवेबद्दल सामंत याच्या नातेवाईकांनी सोमेश्वरओसीई हॉस्पिटल च्या डॉक्टर सर्व स्टाप व मनेजमेंट यांचे जाताना आभार मानले.