पिंपळीत रक्तदान शिबिरात ५७ रक्तबॅग संकलित
बारामती प्रतिनिधी
पिंपळी याठिकाणी अशोक(काका) ढवाण-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५७ रक्तबॅग संकलित करण्यात आल्या.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर सामजिक बांधिलकी जप्त गरजूना वेळेत रक्त मिळावे व एकदा माणसांचे प्राण वाचावे या हेतूने ने अशोकराव ढवाण यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचा निश्चय केला व अवघ्या एका दिवसात नियोजन करून रक्तदान कार्यक्रम आयोजित केला होता.
रक्तदान कार्यक्रमाचा शुभारंभ बारामती अँग्रो चे चेअरमन राजेंद्रदादा पवार व उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांचे हस्ते फीत कापून करण्यात आला.
देशात सर्वत्र कोरोना महामारीमुळे रक्तताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आयोजकांच्या वतीने सामाजिक जाणिवेतून घेण्यात आलेला हा रक्तदान शिबिर कार्यक्रम स्तुत्य असा उपक्रम आहे.तसे तरुण आणि सामाजिक, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढे येऊन असे लोकोपयोगी कार्यक्रम घेण्याचे आवाहन करण्याबरोबरच आमची कोठे गरज भासल्यास कळवावे लागेल ती मदत करू तसेच कोरोना झालेल्या रुग्णांना सर्वांनी धीर द्यावा, वेळेत त्यांना औषधुपचार करावेत, रुग्णांनी घाबरून न जाता वेळेत उपचार घेतल्यास कोरोना शंभर टक्के बरा होतो, कोरोना रुग्ण आजारापेक्षा भीतीने दगावतात त्यामुळे भीती बाळगू नये,जसे आपले घर,तसा आपला परिसर स्वच्छ ठेवावा म्हणजे गावात एकही रुग्ण आढळणार नाही,असे मनोगत व्यक्त करताना राजेंद्रदादा पवार यांनी मार्गदर्शक सूचना केल्या.
उपविभागीय अधिकारी यांनी देखील शुभेच्छा दिल्या व कठीण प्रसंगात घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद पद असून असेच सामाजिक कार्यक्रम कोरोना चे नियम पाळून आयोजित करावेत आणि सॅनिटायजर व मास्कचा वापर करावा.
नियोजन कामी छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण-पाटील सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी मदत केली.
आयोजकांच्या उपहार चहा-नाष्टा,केळी व N95 मास्क भेट देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक रक्तदात्यास एक लाखाचा वार्षिक मेडिक्लेम देण्यात आला.
रक्तदान संकलित करण्यासाठी अविनाश ननवरे व त्यांचे मुक्ताई ब्लड सेंटर,इंदापूरचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभले.
रक्तदान नंतर मुक्ताई ब्लड सेंटर,इंदापूर च्या वतीने आयोजकांना प्रमाणपत्र व ट्रॉफी भेट देण्यात आली.
यावेळी बारामती अँग्रो चे चेअरमन राजेंद्रदादा पवार, उपविभागीय अधिकारी बारामती दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे,छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील, बारामती खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन भाऊसो भिसे,बारामती संजयगांधी निराधार योजना समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, सरपंच मंगल केसकर,उपसरपंच राहुल बनकर, श्रीराम विविध विकास सोसायटीचे चेअरमन रमेशराव ढवाण-पाटील, पोलीस पाटील मोहनराव बनकर, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,गाव कामगार तलाठी तेजस्वी मोरे,ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब देवकाते पाटील,अजित थोरात, सदस्या स्वाती ढवाण-पाटील, पिंपळी आरोग्य विभाग सी.एच.ओ.दिपाली शिंदे, ग्रामस्थ अँड.सचिन वाघ,हरिभाऊ केसकर,पप्पू टेंबरे, रामचंद्र बनकर सर, महेश चौधरी सर,कण्हेरी गावचे मा.सरपंच सतीश काटे,आबासो मारुती देवकाते,आनंदराव देवकाते, दिपक देवकाते सर, लालासाहेब चांडे, सोना देवकाते पाटील,समशेर इनामदार,रघुनाथ देवकाते,कल्याण राजगुरू, शुभम वाघ,त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक केशव आगवणे सर,आरोग्य सेवक राहुल घुले, आरोग्य सेविका नफिसा तांबोळी,ग्रामपंचायत कर्मचारी व रक्तदाते आदींसह गावातील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व रक्तदात्यांचे आभार आयोजकांच्या वतीने श्रीराम सोसायटीचे चेअरमन रमेशराव ढवाण पाटील यांनी मानले.