Type Here to Get Search Results !

बारामतीतील मुर्टी , तरडोली, मोरगाव या गावातील भैरवनाथ यात्रा उत्सव रद्द...

बारामतीतील मुर्टी , तरडोली, मोरगाव या  गावातील भैरवनाथ यात्रा उत्सव रद्द...
मोरगाव प्रतिनिधी

बुधवार दि .१९ पासून सुरू होणाऱ्या मुर्टी , तरडोली, मोरगाव या  गावातील भैरवनाथ यात्रा उत्सव कोरोना या  विषाणुजन्य आजाराचा वाढता फैलाव  लक्षात घेता रद्द केला आहे . यात्रा  उत्सव कमिटी मार्फत जनजागृती करून यात्रा रद्द  भरणार नसल्याने  मंदिर परीसरात न येण्याचे आवाहन केले आहे .


 ग्रामीण भागात  दरवर्षी भैरवनाथ यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न केला जातो . ग्रामीण पट्ट्यामध्ये हा एकमेव मोठा उत्सव असल्याने गावातील तरुण वर्ग उस्फूर्तपणे  सहभाग घेत असतात . या दिवशी मंदिरावर तसेच गावात संपूर्ण विद्युतरोषणाई केली जाते . तसेच पाहुण्यांसाठी गोड -  तिखट जेवणाचा बेत आवर्जून आखला जातो .

गावामध्ये यात्रेच्या पहील्या दिवशी सायंकाळी  जोगेश्वरी व श्री नाथनाथ यांचा विवाह सोहळा संपन्न होतो . या विवाहाला हजारोंच्या संख्येने भक्त उपस्थित असतात


 मात्र गेल्या वर्षी प्रमाणे याहीवर्षी प्रशासनाने सार्वजनिक उत्सव संपन्न करण्यास  परवानगी नाकारली आहे . यामुळे तरडोली  ,मुर्टी, मोरगाव गावात दवंडी व विविध  व्हाट्सअप ग्रुपच्या आधारे यात्रा  उत्सव रद्द झाला  असल्याची माहिती तरडोली गावचे सरपंच नवनाथ जगदाळे यांनी दिली आहे . तरडोली व मुर्टी येथील  भैरवनाथ यात्रा उत्सव आज बुधवारी दिनांक 19 व 20 रोजी  तर मोरगाव येथील भैरवनाथ यात्रा उत्सव 20 व 21,तर मुटीँ येथील आज ,उद्या रोजी संपन्न होणार होता . या   गावांमध्ये मनोरंजनासाठी  संगीत व वगनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते.

.......................................................
 सलग दुसऱ्या वर्षी  मोरगाव येथे भैरवनाथ यात्रा  उत्सव भरणार नाही . कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य करावे  तसेच  श्रींस  घरातूनच   नैवेद्य दाखवावा 

निलेश केदारी : सरपंच ग्रामपंचायत मोरगाव 

.....................................................

 कोरोनाचा फैलाव  ग्रामीण भागात  वाढत चालला आहे . यामुळे प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी  भैरवनाथ मंदिर परिसरात ,   गावांमध्ये  घोळक्याने एकत्र येऊ नये . यात्रेनिमित्ताने गावात पै - पाहुणे बोलवु नयेत 

नवनाथ जगदाळे - सरपंच ग्रामपंचायत तरडोली 

..................................................

कोरोनाच्या च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच धार्मिक स्थळ यात्रा , जत्रा बंद असल्यामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार याहीवर्षीची मुर्टी गावची  भैरवनाथ यात्रा ग्रामकमिटीने रद्द  केल्या च ग्रामस्थांना आव्हाहन केले सर्वांनी .. घरी रहा सुरक्षित रहा... आणि प्रशासनाला मदत करा असे त्यांनी बोलताना आवर्जून सांगितले.

किरण  जगदाळे - उपसरपंच  ग्रामपंचयत मुर्टी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test