Type Here to Get Search Results !

बारामती तालुक्यातील को-हाळे बुद्रुक या गावातील भैरवनाथ यात्रा उत्सव रद्द...

बारामती तालुक्यातील को-हाळे बुद्रुक  या  गावातील भैरवनाथ यात्रा उत्सव रद्द...

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील को-हाळे बुद्रुक  या  गावातील भैरवनाथ यात्रा उत्सव कोरोना या  विषाणुजन्य आजाराचा वाढता फैलाव  लक्षात घेता रद्द केला आहे . यात्रा  भैरवनाथ उत्सव यात्रा  कमिटी  जनजागृती करून यात्रा   भरणार नसल्याने  मंदिर परीसरात न येण्याचे आवाहन सरपंच रवींद्र खोमणे यांनी  केले आहे .

   दरवर्षी भैरवनाथ यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न केला जातो . ग्रामीण भागातील  गावांमध्ये  एकमेव मोठा उत्सव असल्याने गावातील तरुण वर्ग उस्फूर्तपणे  सहभाग घेत असतात . या दिवशी मंदिरावर तसेच गावात संपूर्ण विद्युतरोषणाई केली जाते .येणाऱ्या पाहुण्यांसाठी गोड -  तिखट जेवणाचा बेत आवर्जून आखला जातो .

गावामध्ये यात्रेच्या पहील्या दिवशी  विवाह सोहळा संपन्न होतो . या विवाहाला हजारोंच्या संख्येने भक्त उपस्थित असतात.

 मात्र गेल्या वर्षी प्रमाणे याहीवर्षी प्रशासनाने सार्वजनिक उत्सव संपन्न करण्यास  परवानगी नाकारली आहे .या  आधारे यात्रा  उत्सव रद्द झाला  असल्याची माहिती को-हाळे बुद्रुक गावचे सरपंच रवींद्र खोमणे यांनी दिली आहे . 

 मंगळावर पासून सुरू होणारा भैरवनाथ यात्रा उत्सव  हा देवाची  हळद , लग्न ,छबिना तर   गावांमध्ये मनोरंजनासाठी  संगीत, वगनाट्य,तमाशा व कुस्त्या चे मोठे आयोजन केले जाते.परंतु गेले दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा  न भरल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली
.......................................................

सलग दुसऱ्या वर्षी  को-हाळे बुद्रुक येथे भैरवनाथ यात्रा  उत्सव भरणार नाही . कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य करावे  तसेच  देवाला  घरातूनच   नैवेद्य दाखवावा, कोरोनाचा फैलाव  ग्रामीण भागात  वाढत चालला आहे . यामुळे प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी  गावातील भैरवनाथ मंदिर परिसरात ,   गावांमध्ये  घोळक्याने एकत्र येऊ नये . यात्रेनिमित्ताने गावात पै - पाहुणे बोलवु नयेत.

रवींद्र खोमणे- सरपंच ग्रामपंचायत को-हाळे बुद्रुक
पोलीस पाटील-शरद खोमणे  को-हाळे बुद्रुक
भैरवनाथ उत्सव यात्रा  कमिटी  को-हाळे बुद्रुक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test