वाल्हे येथील रक्तदान शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद
पुरंदर तालुका प्रतिनिधी सिकंदर नदाफ
एकिकडे देशात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असताना अॅनेमिया ,हिमोफेलिया व इतर आजारांशी निगडीत असणाऱ्या रुग्णांना देखील रक्ताची नितांत गरज भासत आहे .त्यांची गरज लक्षात घेऊनच वाल्हे येथील श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला असल्याचे चित्र आहे.
यावेळी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांसह विविध सामाजिक, राजकीय संघटना व प्रामुख्याने अक्षय ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने येथील भैरवनाथ मंदिरात शासन नियमांचे पालन करत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात सुमारे ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून प्लाझ्मा दान करण्यासाठी देखील जवळपास १५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच सॅनिटायझर मास्क व अल्पोहार देखील देण्यात आल्याने प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या शिबिरास जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांसह वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले ,भैय्या साहेब खाटपे, माजी सभापती गिरीश पवार ,प्रा.सचिन दुर्गाडे , दत्तात्रेय पवार ,सचिन लंबाते, यशवंत पवार ,अमोल भुजबळ ,प्रशांत दोशी,अतिश जगताप, नाना दाते,हनुमंत पवार ,सुर्यकांत भुजबळ, राहुल यादव ,विकास पवार, सागर भुजबळ, गोरख मेमाणे, शरद कदम तसेच मंदिराचे पुजारी सचिन आगलावे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.