निमगाव भोगी येथे ग्रामसंनियंत्रण समितीला भेट देत सुरक्षिततेच्या दृष्टीने केल्या सूचना:सुभाष मुंडे
रांजणगाव एमआयडीसी पोलीस(ता शिरूर) स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निमगाव भोगी येथील कोरोना संसर्गजन्य असणाऱ्या काही पॉझिटिव्ह रुग्णास रुग्णालयात तर या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत गाव सुरक्षित बाबत मुंडे यांनी उपस्थित असणाऱ्या पदाधिकारी व ग्रामस्थांना सूचना देत काळजी घेण्याचे आवाहन केले , निमगाव भोगी येथील कोरोना संसर्गजन्य पेशंट ची संख्या 20 च्या वर गेल्या मुळे...रांजनगाव एमआयडीसी पोलीस ठाणे च्या गावास भेट दिली , तसेच गावपरिसरात इतरत्र कोणीही फिरू नये मास्क सैनी टायझजर वापर करा आणि घरी रहा सुरक्षित रहा असेही या बैठकीदरम्यान आवर्जून मुंडे यांनी सांगितले तसेच कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले
याप्रसंगी उपनिरीक्षक सुभाष मुंडे ,अंमलदार गायकवाड तसेच गावचे सरपंच सचिन सांबारे ,उपसरपंच सिंधुबाई रासकर,पोलीस पाटील रामचंद्र व्यवहारे , ग्रामसेवक डी आर वाघोले , आरोग्य सेवक डॉक्टर माने , मुख्याध्यापक गागरे सर , मुख्याध्यापक भोस सर व इतर मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते