Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फंडासाठी उडान फाऊंडेशन'ची मदत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फंडासाठी उडान फाऊंडेशन'ची मदत

बारामती प्रतिनिधी

उडान फाऊंडेशन भाग्यश्री ठाकूर व अतुल खैरे यांनी स्वयंप्रेरणेने आपण समाजाचे देणेकरी लागतो या भावनेतून कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्र व बारामतीतील नागरिकांना आरोग्य मदत मिळावी या   उद्देशाने महाराष्ट्रासाठी पायाला भिंगरी बांधून फिरत असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पुणे येथील कौन्सिल हॉल याठिकाणी सदिच्छा भेट घेऊन यांच्याकडे रु.१०००००/- (एक लाख रुपयांचा) धनादेश सुपूर्द केला.
      तसेच गतवर्षी देखील अतुल खैरे यांनी गावात व शासकीय कार्यालयात सॅनिटायजर व मास्क वाटप केले होते.
त्याचप्रमाणे तालुक्यातील काही भागांतील गरजवंताला किराणा व भाजीपाला देखील वाटप केला होता.
ते नेहमीच उडान फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजवंताला मदत करीत असतात.
यावेळी दादांनी स्वयंप्रेरणेने सेवाभावी संस्था,तरुणाई मदतीसाठी पुढे येत आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे मनोगत व्यक्त केले.
    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष प्रशांत जगताप व इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test