त्या..भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ दौड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसिल कार्यालय दौंड येथे मुक आदोलन..
दौंड प्रतिनिधी
6 मे 2021 पश्चिम बंगाल मधील भाजपा कार्यकर्त्यांवर होणाऱ्या भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ निदर्शने दौंड तालुक्यात करण्यात आले
ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे समर्थक कार्यकर्ते पश्चिम बंगाल मधील निवडणूका जिंकल्या नंतर भाजप कार्यकर्त्यांचे खून आणि त्यांच्यावर खूनी हल्ले तसेच घरांची नासधूस व भाजप कार्यालयांची जाळपोळ करीत आहेत त्यामुळे पश्चिम बंगाल मधे निवडणुक निकाल जाहीर झाल्यापासून आत्तापर्यंत 28 भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली असून हजारो कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.
या भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात सोशल डिस्टंसचे पालन करीत मूक निदर्शने व निषेध आंदोलने करण्यात आली आहेत या आदोलनाचा भाग म्हणुन दौंड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसिल कार्यालय दौंड येथे मुक आदोलन करण्यात आले यावेळी भाजपचे किसान मोर्चे सरचिटणीस वासुदेव काळे दौंड तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, गणेश आखाडे ,माऊली शेळके, बापुराव भागवत ,योगेश थोरात , सुनिल दोरगे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते