सोमेश्वरला अवकाळी पावसाचा काही गावांना चांगलाच शिरकाव..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीतील सोमेश्वरनगर परिसरात गेले दोन दिवस अवकाळी पावसाचे वातावरण असून करंजे, सोरटेवाडी, मगरवाडी,वाकी, चौधरवाडी मुटीँँ,रासकरमळा, देऊळवाडी, माळवाडी, वाकी चोपडज, निंबुत, वाघळवाडी वाणेवाडी होळ , दहा फाटा , वडगाव निंबाळकर गावामध्ये रविवारी दि ९सायंकाळी पाऊसाचा शिरकाव झाला आहे तसेच आज वातावरनात सकाळ पासूनच प्रचंड गरमीने निर्माण झाली असून पाऊस पडण्याची शक्यता होती.
त्या अनुषंगाने सोमेश्वरनगर माधील काही गावांमध्ये चांगलाच पाऊस होऊन शेतात रस्त्यालगत पाणी साठले चे दिसून आले परिसरातील शेतातील मका,कांदा, भुईमूग,ज्वारीसह इतर खरीप पिके थोडीफार पाण्यात गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे बोलताना शेतकरी महादेव शिवराम रासकर यांनी सांगितले.
मका भुईमूग वांगी
सकाळपासून नेहमी प्रमाणे शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरू असल्याने आलेल्या पावसाने सर्वत्र मात्र धांदल उडाली आहे..
अवकाळी पाऊस जर झाला तर शेतातील तरकरी पिकांचे नुकसान होईल अशी भीतीही काही शेतकऱ्यांनी बोलतां व्यक्त केली तर पुढील काही दिवसांसाठी उभ्या पिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार असून माळरानावर गवत उगवण्यास याची मदत होईल त्यामुळे मेंढपाळ व्यवसायिकांनी याचे मात्र समाधान व्यक्त केले