बारामतीचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे गोरगरीब लोकांसाठी दैवी आवतारच
बारामती प्रतिनिधी
पिंपळी इंदिरानगर बरोबरच बारामती परिसरातील पारधी समाज व इतर गोरगरीब लोकांना बारामती शहर पोलीस स्टेशनमार्फत रुचकर असा खिचडी भात वाटप.
जगात सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले असून गेले दीड वर्ष झाले.पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि डॉक्टर्स रुग्णांसाठी चोवीस तास नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
त्यातच वाढत्या कोरोनासंख्येमुळे व मृत्यूमुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य सरकार व बारामतीमध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार लॉकडाऊन करण्यात येत आहे.
अशा कठीण परिस्थितीत अनेक गोरगरीब लोकांचे अनेक छोटे-मोठे व्यवसाय,उद्योगधंदे आणि रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच भटकंती करणाऱ्या लोकांचे तर जीवन खडतरच बनत चालले आहे. अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा कठीण परिस्थितीत बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे हे परिसरातील आढावा घेण्यासाठी येतात.तेव्हा त्यांना लॉकडाऊनमुळे अनेक लोकांची खाण्याची दयनीय अवस्था निर्माण झालेली दिसली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन ते लॉकडाऊनची जबाबदारी पार पाडत आहेत.
उपासमार होत असलेल्या बारामती व परिसरातील नागरिकांना स्वतः पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे व बारामती शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सह.पोलीस निरीक्षक संजय जगदाळे,पोलीस नाईक दादासाहेब डोईफोडे,पोलीस हवालदार भारत ससाणे,नवनाथ शेंडगे,भगवान दुधे,सचिन कोकणे व सर्व बारामती शहर पोलीस स्टेशन स्टाफ हे स्वतः जाऊन पिंपळी-इंदिरानगर येथील पारधी समाज व तेथील गोरगरीब लोकांना आणि बारामती परिसरातील पारधी समाज आणि इतर गरीब गरजू लोकांना खिचडी भात खाऊ घालत आहेत.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पिंपळी-इंदिरानगर परिसरातील लोक त्यांना देवदूतच मानत आहेत.
कोणी कल्पना देखील करू शकत नाही की, खाकी वर्दी मागे देखील देवदूत दडलेला असतो.लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच पोलीस अधिकारी गोरगरीब लोकांना अन्नदान करतील. पण हे वास्तविक सत्य असून याचे दर्शन बारामती शहर चे पो.नि.नामदेवराव शिंदे साहेब यांच्या रूपाने घडते.
आतापर्यंत लोकांना एवढेच माहिती आहे. लॉकडाऊन काळात विना मास्क, विनाकारण फिरले की शिक्षा म्हणून लाठीचार्ज होतो. पण त्यालपलीकडेही पोलिसांकडे माणूसकी असते. हे पोलीस निरीक्षक शिंदे यांचेकडे पाहिलेवर दिसते.आजपर्यंत विनाकारण फिरणाऱ्यांना शिक्षा म्हणून काठी ने मारलेले,जोर बैठका मारायला काढायला सांगितलेले व्हिडिओ व्हायरल झाले. परंतु शिंदे साहेबांची दूरदृष्टी त्याहीपलीकडची आहे त्यांना स्वतःच्या जबाबदारी बरोबर उपासमारीने मरत असलेल्या लोकांची देखील काळजी कीव आहे. आपण समाजाचे काहीतरी देणेकरी आहोत. या सामाजिक जाणिवेतून ते लोकांची अन्न वाटप करून मनोभावी सेवा करत आहेत.
समाजकार्याने प्रेरित झालेले व अनेक पीडित लोकांना न्याय मिळवून देणारे कर्तव्यनिष्ठ व आदर्श पोलीस अधिकारी बारामती लाभले असे पोलीस अधिकारी जगामध्ये शोधून सुद्धा सापडत नाहीत.ते बारामतीला लाभले हे बारामतीकरांचे नशीबच म्हणावे लागेल.