करंजे गावातील गरजू कुटुंबांना वडगाव पोलिसांकडून किराणा किटचे वाटप
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने गरीब कुटुंबांचे जगणे मुश्कील झाले आहे अशा परिस्थितीत गरीब कुटुंबांना किराणा कीटचे वाटप करत वडगांव पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे.आज करंजे गावमधील गरज असलेल्या कुटुंबांना या किराणा किटचे वाटप वडगाव पोलिसांकडून करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने महाराष्ट्रात एक जून पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यानच्या काळात अनेक छोटे-मोठे उद्योग बंद पडले असून हातावर पोट असलेल्या कुटुंबांना दोन वेळचे खाणे ही मुश्कील झाले आहे.
करंजेगाव तसा मजूर वर्ग ज्यास्त प्रमाण आहे.. गावातील अशा गरीब कुटुंबाना मदतीची गरज असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना दिली होती. ही माहिती मिळताच आज सोमवार दि २४ रोजी लांडे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कुटुंबांना घरपोच किराणा किटचे वाटप केले. यावेळी पोलीस हवलदार बाळासाहेब पानसरे,होमगार्ड सचिन पिंगळे , अजय नलवडे तसेच करंजे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड,प्रणाली सवस्थेचे अध्यक्ष बुवासाहेव हुंबरे,सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब हुंबरे, निलेश गायकवाड,अनिल जाधव,अभिनय हुंबरे,पत्रकार विनोद गोलांडे व मान्यवर उपस्थित होते
किराणा किट वाटप केलेल्या गरजू पुरुष- महिलांनी पोलिसांचे आभार मानले