अन...पन्नास वर्ष्यान पासूनचा वाघळवाडीतील सांडपाण्याचा प्रश्न तरुणयुवक, शेतकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मिटवला...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
ग्रामसभा आली की प्रश्न चर्चेला जायचा. त्यावर चर्चा होयची पण पर्याय निघत नसे.पण प्रश्न सोडवायचाच ठरवलं तर सगळे प्रश्न सुटतात. त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सुटलाच पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी काळया मायेत उगवलेल्या उभ्या पिकातून ग्रामपंचायतीच्या कामास सहकार्य केले.आणि प्रश्न निकाली निघाला.
विषय सुध्दा तसा महत्वकांक्षी होता. सांडपाणी सोडण्याचा पण, त्यावर कायमस्वरूपी पर्याय निघत नव्हता. वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या गावठाण भागातील जवळपास ४० ते ५० वर्षांपासून दोनएकशे घरांचा सांडपाणी सोडण्यासाठी पर्याय निघत नव्हता. सगळं गावच पाणी एकत्र येऊन कुणाच्या शेतात तर कुणाच्या घराच्या आजूबाजूला मूरत होतं. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव, दुर्गधी आणि शेकऱ्याच्या जमिनी सतत ओल्या रहात भयंकर त्रास होत असत.परिणामी आजरी सुद्धा पडत. पावसाळा आला की हे सांडपाणी आणि पावसाचे पाणी यामुळे प्रश्न अधिकच गंभीर बनत.सांडपाणी शेतात पिक उगवत नसत व शेतकर् याच फार मोठे नुकसान होत त्यामुळे सारखे वाद -तंटे होत असत.
ग्रामपंचायतीची ग्रामसभा आली की या विषयावर चर्चा होऊन तो विषय तसाच पुढं सरकत रहायचा. गावाच्या खालच्या बाजूला सगळी शेती असल्याने शेतातून सांडपाणी जाण्यासाठी कोठून मार्ग काढायचा हा मोठा प्रश्न होता.शेतकऱ्यांशी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली त्यावर शेतक-यांनी मोठेपणा दाखवत शेताच्या मध्यभागातुन भूमिगत गटर जाण्यासाठी जागा दिली.आणि सांडपाणी सोडण्याच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळाला आहे. या कामासाठी सरपंच नंदा सकुंडे, गावातील राष्ट्रवादी पदाधिकारी, व ग्रामपंचायत सदस्य यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने गावच्या सांडपाण्याची व्यवस्था होऊ शकली.
गावचा प्रश्न मिटतोय हे पहाण्यासाठी गावातील ४०० ते ५०० ग्रामस्थ कामाच्या ठिकाणी आवर्जून येऊन पाहून गेले. आणि तरुणांनी पुढाकार घेत केलेल्या कामाचे कौतूक करत अनेक वर्षे जे झालं नाही ते ह्या तरुण पोरांनी करून दाखवलं म्हणत कौतूक केले. चार ते पाच फूट जमिनीच्या खाली खोल तर दीड फूट व्यासाची पाईप मधून सांडपाणी गावाच्या बाहेर सोडण्यात आले आहे.
या कामाचा शुभारंभ करतेवेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग भोसले, हेमंत गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव सावंत, ग्रामविकास अधिकारी सुभाष चौधर, ज्येष्ठ ग्रामस्थ रामचंद्र जाधव, युवा नेतृत्व तुषार सकुंडे, भानुदास जाधव, हेमंत सावंत, राजेंद्र काशवेद, सुभाष शिंदे, हेगडे गुरुजी, सुभाष सावंत आदि ग्रामस्थ व ठेकेदार सागर गायकवाड, विजयेंद्र शिंदे उपस्थित होते.
शेतकरी राजा असतो हे उभ्या पिकातून जागा देऊन दाखवून दिलं
गावच्या सांडपाण्याची व्यवस्था करणे तस जिकरीचे काम होत. हा प्रश्न मिटन तितकं सोप्प काम नव्हतं.पण तरुण पोरांनी हाती घेतलेल्या कामाच्या प्रश्नासाठी उभ्या उसातून नागेशवर सकुंडे यांनी तर जनावरांना केलेल्या उभ्या पिकातून सतिश सदाशिव सावंत, बबन अनपट,अंकूश सकुंडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. तर बांधावरून तुझं माझं होत पण कुंडलिक सकुंडे आणि सरपंचाच्या पतीने राजकुमार सकुंडे यांनी शेताच्या मध्य भागातून गटरची पाईप लाईन जाऊन दिली.या शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्याने हा प्रश्न मिटला आणि शेतकरी राजा असतो हे दाखवून दिलं.
गावातील विकास कामे करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रमोद काकडे, संभाजी होळकर यांच्याकडे निधीची मागणी सतिश सकुंडे, अजिंक्य सावंत,जितेंद्र सकुंडे, हेमंत गायकवाड व तुषार सकुंडे यांनी केलेल्या पाठपुरावामुळे आत्तापर्यंत गावात जवळपास ३ कोटी रु निधी मिळाला सर्व कामे दर्जेदार व सुरळीत चालू आहेत. व गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सर्व नागरिकांना बरोबर घेऊन दर्जेदार विकास कामांसाठी कटिबद्ध आहे
---- सरपंच नंदा सकुंडे ----