एक हात मदतीचा सुवर्णस्टार सोशल क्लब जेजुरी यांचा स्तुत्य उपक्रम...
पुरंदर तालुका प्रतिनिधी सिकंदर नदाफ
जेजुरी येथील सुवर्णस्टार सोशल क्लब व
जेजुरी युवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने "अक्षय तृतीया व रमजान ईद " चे औचित्य साधून
निरा-शिवतक्रार ग्रामपंचायत कोरोना विलगीकरण कक्ष तसेच येथील वाॕर्ड नं१ मधील गोपाळ वसाहतीमध्ये आमरस -पुरी चे मिष्टान्न भोजन देण्यात आले .
खासदार मा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरंदर-हवेलीचे कार्यक्षम आमदार मा.संजयजी जगताप सरांच्या पुढाकाराने
तसेच ज्युबिलंट इनग्रेव्हिया व
निरा-शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच कोविड-१९ विलगिकरण कक्ष सुरु झाल्याने
या परिसरातील कोरोना बाधितांसाठी अत्यंत सोयीस्कर ठरत आहे.
तीन दशकांहून अधिक काळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेने जेजुरी पंचक्रोषीमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून कोरोना महामारी संकटकाळात सुवर्णस्टार व युवा ग्रुप चे सर्व सदस्य एका दिलाने उस्फुर्तपणे
गोरगरीब,गरजूंना मोफत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप तसेच अल्पोपहार व भोजन वाटप करीत असून सर्वसामान्यांच्या अडिअडचणीप्रसंगी तत्परतेने " " "मदतीचा एक हात "
पुढे करुन आधार देण्याचे कार्यामध्ये
तमाम महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंड कडेपठार महाराजांमुळे आम्हांला बळ व ऊर्जा मिळते,
अशी भावना संस्थेचे मा.मनोजशेठ मोहिते यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी मा. सरपंच व विद्यमान उपसरपंच मा.राजेशभाऊ काकडे, काँग्रेस प्रवक्ते
ॲड विजय भालेराव ,मा.जि.प. सदस्य विराजभैय्या काकडे ,निरा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक मा.कैलास गोतपागर, निरा शहर काँग्रेस अध्यक्ष मा.हरिभाऊ जेधे,ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव ,राधाताई माने, अनंता शिंदे , बाबाभाई बागवान तसेच सुवर्णस्टार सोशल क्लब व जेजुरी युवा ग्रुप चे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.