जेजुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे २४ लाख ८८ हजार रुपये सहिसलामत
काही तासातच गुन्ह्याचा छडा, जेजुरी पोलिसांची कामगिरी
जेजुरी दि.२२(प्रतिनिधी) - जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये असणारे बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम मशीन चोरट्यांनी चोरुन नेले परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यामधील असणारे २४ लाख ८८ हजार रुपये मिळविण्यात पोलिसांना यश आले
याबाबत ची सविस्तर माहिती अशी की जेजुरी एम आय डी सी मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम मशीन असुन ते मशीन मध्यरात्री एक किंवा दोन च्या सुमारास चोरट्यांनी काचेचा दरवाजा फोडुन एटीएम मशीन दोराच्या सहाय्याने ओढत नेले असल्याची माहिती सकाळी साडे नऊ वाजता जेजुरी पोलिस स्टेशनला मिळाली सदर घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांच्या टिमने तात्काळ पाहाणी केली असता संपूर्ण मशीनच गायब असल्याचे निदर्शनास आले सदर तपासाला वेगाने सुरुवात केली वेगवेगळी पथके तयार करुन चारी दिशेला रवाना करण्यात आली, सीसीटीव्ही फुटेज पाहाण्यात आले परंतु त्यामध्ये काही माहिती मिळाली नाही परंतु पुढे शोध घेत असताना निरा रोड ने दौंडज अलीकडे पवार वाडी कडे एक कच्चा रस्ता जातो त्या रस्त्याच्या कडेला पाहणी केली असता त्यांना एटीएम चे नटबोल्ट पाडलेले दिसले अजुन पुढे जाऊन पाहाणी केली असता एटीएम चे हार्डवेअर बाजुला पडलेले दिसले पुढे दगडामध्ये एटीएम ची लोखंडी पेटी लपवलेली दिसली चोरट्यांनी ती पेटी घाव घालून व नटबोल्ट तोडण्याचा प्रयत्न केला असता ती फुटली नसल्याने ती पेटी तिथेच लपवुन ठेवली पोलिसांना ती पेटी शोधण्यात यश आले सदर एटीएम मधुन चोरीस गेलेले २४ लाख ८८ हजार रुपये सुरक्षित असुन एटीएम वेंडर चे लोकांना बोलावून सदर पेटी उघडुन पैसे जप्त करण्यात आले आहेत लवकरच एटीएम चे हार्ड डिस्क वरुन फुटेज घेऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी अटक केलं जातील सदर कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलिस हवालदार कारंडे, पिंगळे,खांडे,यादव, गणेश कुतवळ, शेंडे, प्रशांत पवार, संजय धमाल आदिंनी केली