भारतीय रिझर्व बँकेची गोल्ड बाँड स्कीम जाहीर:किरण आळंदीकर
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी भारतीय रिझर्व बँकेने आज दिनांक १४ मे रोजी गोल्ड बाँड स्कीम जाहीर केली.या मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी प्रती एक ग्राम ४७७७ /- (चार हजार सातशे सत्त्याहत्तर ) रु.दर बँकेने निच्छित केला असून, हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन प्रा. लि. ( IBJA ) या राष्ट्रीय सराफ संस्थेच्या दि.११ मे ते १४ मे या कालावधी मधील सुट्टीचा एक दिवस सोडून इतर ३ दिवसांच्या सरासरी दरावरून अधिकृत दर ग्राह्य धरून नीच्छित केले असल्याची माहिती इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य समन्वयक किरण आळंदीकर यांनी माहिती दिली.
हे गोल्ड बाँड १७ मे ते २१ मे २०२१ या पाच दिवसांच्या कालावधी मध्ये गुंतवणूकदारांना खरेदी करता येतील.
या गोल्ड बाँड साठी वार्षिक २:५ % इतका सरासरी व्याज दर बेंकेकडून दिला जातो.या शिवाय ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी सोन्याच्या जाहीर केलेल्या दरामध्ये ५० /- रु प्रती ग्राम सुट देण्यात आली असून त्याचा दर प्रती ग्राम. ४७२७ /- ( चार हजार सातशे सत्तावीस ) रु. इतका असणार असल्याची माहिती आळंदीकर यांनी दिली.