"अविष्यात ट्रस्ट " ठाणे यांच्यावतीने सोमेश्वर-करंजे परिसरातील गरजूंना एक हात मदतीचा.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने गरीब कुटुंबांचे जगणे मुश्कील झाले आहे . अशा परिस्थितीत गरीब कुटुंबांना किराणा कीटचे वाटप
"अविष्यात ट्रस्ट " ठाणे चे संस्थापक अध्यक्ष डॉ मिलिंद बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य हरीश्वर शिंदे यांनी सोमवारी दि ३१ रोजी करंजे परिसरात किराणा साहित्य घरपोच वाटप केले हे साहित्य मिळाल्याने गरजू लोकांनी त्यांचे आभार मानत हे साहित्य स्वीकारले त्याचा समाधान शिंदे यांना झाला व यापुढेही ट्रस्ट अध्यक्ष डॉ मिलिंद बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर परिसरात नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत त्यांना विविध प्रकारची मदत करण्याचे बोलताना शिंदे यांनी सांगितले.
"अविष्यात ट्रस्ट " ठाणे यांनी कोल्हापूर, सोलापूर,अहमदनगर या जिल्ह्यात केलेल्या कोव्हीड काळात विविध उपक्रम व गरजू परिवाराला मदत करत असल्याची माहिती मिळताच त्यांना करंजे परिसरातील अशाच काही गरीब कुटुंबाना मदतीची गरज असल्याची माहिती स्थानिक पत्रकार विनोद गोलांडे "अविष्यात ट्रस्ट " ठाणे यांना दिली होती. ही माहिती मिळताच आज ट्रस्ट चे सदस्य सहकारी यांनी कुटुंबांना घरपोच किराणा किटचे वाटप केले
किराणा साहित्याचे वाटप करता वेळी करंजे मा. सरपंच बाजीराव शिंदे ,पत्रकार विनोद गोलांडे ,
ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे,करंजे तलाठी दादासाहेब आगम,सामाजिक कार्यकर्ते आनंत मोकाशी , भाऊसाहेब हुंबरे , संजीत शिंदे,धीरज भगत इत्यादी उपस्थित आहे.