Type Here to Get Search Results !

पिंपळी येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी गाव भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

पिंपळी येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी गाव भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
बारामती प्रतिनिधी

   उपविभागीय अधिकारी देशमुख यांनी गावातील कोरोना परिस्थितीचा  आढावा घेत असताना काही मार्गदर्शक सूचना केल्या त्यामध्ये प्रामुख्याने गृहविलगीकरणात कोरोनाग्रस्त नागरिकांना ठेवू नये. त्यांना प्राधान्याने हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या.विलगीकरण व्यवस्थित रित्या होत नसल्याने संपूर्ण कुटुंब संक्रमित होत आहेत. त्यामुळे गावातील कोरोना संक्रमित संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यात पिंपळी गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालले आहे. ही बाब चिंतेची असून सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवे. त्यामुळे सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाग्रस्त नागरिकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे हॉस्पिटल व कोरोना सेंटरमध्ये विलगीकरणसाठी बेड शिल्लक आहेत. त्यामुळे बाधित कोणी आढळल्यास घरात विलगीकरण न करता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी आग्रही राहावे.पदाधिकारी,स्वयंसेवक आरोग्य अधिकारी,ग्रामपंचायत कर्मचारी,शिक्षक,आशासेविका यांचे मध्ये समन्वयक असावा जेणेकरुन कोरोना साखळी खंडित करता येईल व आपले गाव कोरोना मुक्त होईल. त्याचप्रमाणे गावात हायरिस्क लिस्टमध्ये व नॉर्मल असणाऱ्या कोरोनाग्रस्त नागरिकांची यादी तयार करून त्यांची आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात येऊन उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात यावे आदी मागदर्शक सूचना उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केल्या. त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीस सूचना करताना कोरोनाग्रस्त कुटुंबाच्या घरी औषध फवारणी सॅनिटायइज करण्यात यावे.तसेच जनजागृती होण्याकरिता कोरोनाची लक्षणे व त्यावरील उपाय अशा मार्गदर्शक सूचनांचे फलक लावण्यात यावेत. तसेच कोरोनाग्रस्तांना वेळेत उपचार मिळणे कामे सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
        लसीकरण नियोजनबद्ध पध्दतीने केल्याबद्दल पिंपळी आरोग्यवर्धनी विभागाच्या सी.एच.ओ.डॉ.दिपाली शिंदे व त्यांचे सहकारी स्टाफ चे कौतुक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी केले.
           गावातील कोरोना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी व कोरोना कार्यात नेमलेले शिक्षक आशा सेविका यांना सर्वोतोपरी मदत करून गावातील कोरोना आटोक्यात आणू अशी 
यावेळी उपविभागीयअधिकारी दादासाहेब कांबळे गटविकास अधिकारी राहुल काळभोर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे,
छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण,बारामती खरेदी-विक्री संघाचे व्हा.चेअरमन भाऊसो भिसे,संजयगांधी निराधार समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, सरपंच मंगल केसकर, उपसरपंच राहुल बनकर,प्रभारी ग्रामसेवक बाळासाहेब भोईटे, सदस्या स्वाती ढवाण,सदस्य आबासाहेब देवकाते, अजित थोरात, उमेश पिसाळ, वैभव पवार तसेच ग्रामस्थ पदाधिकारी अशोकराव ढवाण,हरिभाऊ केसकर,अशोकराव देवकाते, पप्पू टेंबरे, खंडू खिलारे,काटेवाडी वैद्यकीय अधिकारी डॉ.मारकंड जोरे,
पिंपळी आरोग्यवर्धिनी विभागाचे सी.एच.ओ.डॉ.दिपाली शिंदे,आरोग्य सेवक राहुल घुले, आरोग्य सेविका नफिसा तांबोळी, शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,शुभम वाघ,बापूराव केसकर आदींसह गावचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test