मोरगावच्या मयुरेश्वरला संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तुरळक भाविकांची गर्दी
मोरगांव प्रतिनिधी
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथे आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तुरळक भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती . राज्य शासनाच्या सुचनेनुसार मंदिर बंद असल्याने काही भक्तगण चतुर्थीची नेहमीची वारी वाया जावू नये म्हणून मंदिराचा कळस व पायरीचे दर्शन घेऊन जात असताना आढळत होते .
गेल्या दोन महिन्यापासून राज्य शासनाच्या सूचनेनुसार मयुरेश्वर मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे . मात्र दर संकष्टी चतुर्थीला मोरगाव , बारामती व जिल्हाभरातुन भाविक येथे गर्दी करताना आढळून येत आहेत . एरवी संकष्टी चतुर्थीस हजारो भावीक दर्शनासाठी येतात . मात्र लॉकडाऊन काळात चतुर्थीची वारी बंद पडु नये म्हणून मंदिर बंद असले तरी आज मंदिराबाहेरुन पायरीचे , कळसाचे दर्शन घेऊन जाताना भक्त आढळुन येत होते
आज पहाटे पाच वाजता गुरव मंडळींनी प्रक्षाळ पूजा झाली तर सकाळी सात वाजता सालकरी ढेरे यांनी श्रींची पूजा केली . दुपारी 12 व रात्री चंद्रोदयाच्या वेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टवतीने श्रींची पुजा करण्यात आली . रात्री चंद्रोदयाच्यावेळी मोजक्या पुजारी मंडळींच्या उपस्थितीत झालेल्या आरतीनंतर मयुरेश्वरास महानैवेद्य दाखवण्यात आला . आज नेहमीप्रमाणे मंदिर बंद होते . मंदिराचा परिसर लॉकडाऊनमुळे लोखंडी बॅरिकेट्स लावून बंदिस्त केला होता . मात्र बाहेरून अनेक भक्तगण दर्शन घेऊन जात असताना आढळत होते.