आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीस सॅनिटायझर भेट
पिंपळी: बारामती ॲग्रो च्या वतीने कर्जत-जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्यावतीने पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीस सॅनिटायजर भेट देण्यात आले. पिंपळी गावामध्ये कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून अँटिजेन चाचणीही घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीने मिनी ट्रॅक्टरच्या साह्याने रस्ते व आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे.
गावात घेण्यात आलेल्या हॉटस्पॉट अँटिजेन चाचणीत लोकसंख्येच्या पाच टक्के लोक पॉझिटिव्ह आले होते. याची माहिती आमदार रोहितदादा पवार यांना संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी दिली व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करणारे कामगार,आशासेविका यांना रुग्णसंख्या तपासणी कामी व लसीकरणास येणाऱ्या नागरिकांना सॅनिटायजर ची आवश्यकता आहे.तरी ग्रामपंचायतीस सॅनिटायजर मिळावे. याकरिता रोहितदादा पवार यांना मागणी केली व त्यांनी लगेच तत्परतेने बारामती ॲग्रोच्या मार्फत ग्रामपंचायतीस सॅनिटायजर भेट दिले. हे सॅनिटायझर संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी सरपंच मंगल हरिभाऊ केसकर व उपसरपंच राहुल बनकर यांच्याकडे सुपूर्त केले.यावेळी तालुका राष्ट्रवादी सोशल मीडिया चे अध्यक्ष सुनील बनसोडे,
अशोकराव ढवाण पाटील,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब देवकाते पाटील आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.