बारामतीत म्युकरमायक्रोसिस रोगनिदान उपचार तपासणी शिबिराचे आयोजन: किरण गुजर
बारामती प्रतिनिधी
इंडियन डेंटल असोसिएशन बारामती- फलटण शाखाआणि नटराज नाट्य कला मंडळ बारामती
यांच्या वतीने महाराष्ट्रातील पहिले म्युकरमायक्रोसिस रोगनिदान उपचार तपासणी शिबिराचे आयोजन आज बुधवार दि १९ मे रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेमध्ये नटराज नाट्य कला मंदिर, तीन हत्ती चौक बारामती येथे आयोजित करण्यात आले आहे.
बारामती शहर व तालुक्यातील कोरोना आजार होऊन गेलेल्या रुग्णांची म्युकरमायक्रोसिस या रोगा बाबतची तपासणी इंडियन डेंटल असोसिएशन बारामती फलटण ब्रांच यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ विश्वजित निकम व त्यांचे सहकारी करणार आहेत.
ज्यांना कोरोना आजार होऊन गेला आहे. अशा नागरिकांनी या आजाराची संभाव्य धोका टाळण्यासाठी तपासणी करून घ्यावी. सदरची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य केली जाणार आहे. तपासणी दरम्यान येताना आपल्यावरील झालेल्या उपचाराचे पेपर्स सोबत घेऊन यावेत. त्यानंतर सोशल डिस्टंसिंग नियमानुसार प्रवेश तसेच तपासणी केली जाईल अशी माहिती जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली दिली.