Type Here to Get Search Results !

बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची दमदार कामगीरी चालुच.....

Top Post Ad


बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची दमदार कामगीरी चालुच..... 
बारामती प्रतिनिधी

दोन आरोपीकडुन 5 मोटार सायकल, 5 अँड्रॉइयड मोबाईल फोनसह,25,000रू किमतीच्या तांब्याच्या पटटया असा एकुण 2,75,000/-रू किमतीचा मुददेमाल केला हस्तगत
 व मागील काही दिवसापासून बारामती तालुका पोलीस ठाणे हददीतून मोटार सायकल चेारीस जाण्याचे प्रमाण वाढले होते.त्या अनुंषंगाने मा.पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख साो यांनी मोटार सायकल चोरी उघड करणेचे आदेश दिले होते. गुन्हे पथकाने गुप्त माहीतीदारामार्फत माहिती काढून संषयीत इसम नामे.1)रोहन उर्फ कल्ल्या अविदास माने वय.20 वर्षे रा.सुर्यनगरी ता.बारामती जि.पुणे 2)ओंकार सुनील चंदनशिवे वय.20 वर्षे रा.तांदुळवाडी ता.बारामती जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चैकशी करून त्यांच्याकडून त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाणे,बारामती शहर पोलीस ठाणे हददीतून चोरी केलेल्या 5 दुचाकी मोटार सायकल त्यामध्ये होंन्डा शाईन,बजाज पल्सर,दोन स्प्लेन्डर,होन्उा युनिकाॅर्न अशा एकुण 5 मोटार सायकली, 5 वेगवेगळया कंपनीचे अन्ड्राॅइड मोबाईल फोन,25,000/-रू कि च्या तांब्याच्या पटटया असा एकुण 2,75,000/-रू किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख साो,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक योगेष लंगुटे, पोलीस काॅन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, शंशिकांत दळवी,होमगार्ड सिघ्दार्थ टिंगरे,ओंकार जाधव यांनी केली आहे.


                                                     
                              

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.