शिक्षण आणी कष्टावर निष्ठा ठेवणारा अव्वल सुवर्ण कारागीर ..मच्छिंद्रनाथ आळंदीकर .(मैड )
३० व्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली..
आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात रिमझीम चैन म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या चैन च्या डिझाईन चे निर्माते ..बारामतीत शरदचंद्रजी पवार यांचे वर्गात बालवर्गापासुन सातवीपर्यंत शिकलेले असल्याने त्यांचेशी मैत्री असलेले..... स्वर्गीय चंदुकाका सराफ बारामती यांचे लाडके विश्वासु व अव्वल सुवर्णकारागीर आम्हा भावंडाचे वडील मच्छिंद्रनाथ बा आळंदीकर यांचे आज ३० वे पुण्यस्मरण त्यानिमित्त थोडी शब्दपुष्पांजली अर्पण करतो ..
या झोपडीत माझ्या ...." ऱाजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या" हि कविता फक्त ऐकली नाही तर प्रत्यक्षात अनुभवली आम्ही तिघे भावंडे व एक बहिण फोटोतील झोपडी आमचे घर .. जिथे आई वडिलासोबत आयुष्याची वीस वर्ष काढली .. अतिशय हालाकीचे दिवस होते ते ..१९७२ साली सुवर्णनियंत्रण कायदा आला .. चोख सोन्याचे दागीने बनवणाऱ्या बारामतीतील सुवर्णकारागीर अडचणीत आले .वडीलाना बारामती सोडावी लागली ..सोमेश्वराची भक्ती असलेली बारामतीत सिद्धेश्वर मंदीरात अनेक वेळा १६ सोमवारची भक्ती केल्याने करंजेपुल ,सोमेश्वरनगर येथे भाडोत्री घर घेवुन वास्तव्य केले .. ईथे घरोघरी जावुन सोने चांदीचे दागीने नवीन व रिपेअर करुन देण्याचे काम ते करत .. नंतर नीरेच्या सराफ वर्गाचे घरी काम त्यानंतर सहकार महर्षी बाबालाल काकडे यांच्या मदतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत सोनेतारण .. तेथेही मोठा संघर्ष.. मोरगाव ,सुपे .लोणीभापकर ,होळ ,कोऱ्हाळे आदी ठिकाणी पायजम्याला क्लिपा लावुन भाडोत्री सायकलवर प्रवास ..अतिशय संघर्ष करीत चार भावंडाचा संसार हाकत होते .. परिस्थीतीने गांजल्याने एकदा एका खोट्या गुन्हयात देखील अडकण्याची भिती निर्माण झाली . पण तत्कालीन गृहमंत्री व त्यांचे मित्र शरदचंद्रजी पवार साहेब यानी केलेल्या मदतीने खरा गुन्हेगार पकडला गेला व सुटकेचा निश्वास सोडला गेला . एकदा रावडी गावाला भाडोत्री सायकल वरुन सोने चांदी च्या कामासाठी लोकांच्या घरी गेले .. नीरा नदीला पुर आला सायकल सह अचानक वाहु लागले पोहायला येत होते मात्र सायकल सोडली तर सायकल भरुन कशी देणार असा प्रश्न त्याना पडला. लांबपर्यंत वाहत गेले ,मात्र सायकल सोडली नाही हि त्यांची चिकाटी होती कसे बसे होळ परिसरात ते सायकल सह नदीकिनारी पोहत आले . आईसाहेब विमल मच्छिंद्रनाथ आळंदीकर यांची सोमेश्वरावर श्रद्धा असल्याने वडीलाचा सायकल सह जीव वाचला ..पुढे घरी काम करत असताना ..परिसरातील रमाकांत व त्यांचे वडील महादु भाऊ गायकवाड यांचेसह अनेक मान्यवरानी त्यांचे प्रामाणिकपणावर विश्वास ठेवुन मदत केली .संपूर्ण पुणे जिल्ह्यात सोनेतारण व्यवहार तपास अधिकारी म्हणुन त्यांचे पथक करुन प्रमुख तपासणीस म्हणुन त्यांची नेमणुक झाली .. आम्ही भावंडे शिकत होतो .. त्यांच्या हयातीत त्यानी आम्हाला फक्त शिक्षण शिकवले. साधे घरावर पत्रे देखील टाकता आले नाहीत. मात्र त्यांचा शिक्षणावरव भरोसा आणी कष्टावर निष्ठा ईतकी होती कि, मला लहानपणापासूनच " माझा साहेब " अशी हाक देत "ईक दिन बिक जाएगा माती के मोल "हे गाणे ते आवर्जुन म्हणून आम्हाला दिलासा देत .,तांब्याचे वाळे विकणे ,भांड्यावर नावे टाकणे ,पेट्रोलपंपावर ऑईल विकणे असे व्यवसाय करत मी आय टी आय माळेगाव ड्रॉफ्टसमन मेकॅनिक झालो व १७ नंबर ने बाहेरुन बारावी पण झालो ॲप्रेटीस चा कॉल आला मात्र ॲप्रेंटीस च्या मानधनात जगने कठीण होते . मग मी केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झालो ट्रेनिंग चालु असतानाच .त्यांच्या मृत्युची बातमी आली ... दशक्रिया विधीला देखील येवु शकलो नाही ..पुढे मोठा भाऊ किरण याने पारंपारीक सोने चांदीचा व्यवसाय सुरु केला निरेच्या सराफ वर्गाची व ईतर ग्राहकांची कामे सुरु केली माझ्या पगाराचा टेका सुरु झाला. धाकटा भाऊ दिपक याला बरोबर घेवुन व्यवसायात जम बसवु लागले .. आम्ही दोघे वडीलांच्या हाताखाली काम शिकल्याने आमच्या पेक्षा धाकट्या भावाचे ज्ञान कमी म्हणुन त्याला त्र्यंबकेश्वर ला शिकायला ठेवले नंतर केंद्रीय राखीव पोलीस दलातील नोकरी.... तेथे मिळणारा पगार व त्याचबरोबर वाणेवाडीतील सद्गृहस्थ सोमनाथकाका जगताप यानी एक वर्षासाठी हात उसनी दिलेली काही रक्कम.. यामुळे व्यवसाय जम धरु लागला .. कालांतराने मी ही नोकरीतुन व्यवसायात आलो ..
पत्रकारीता ,वकिली ,व ईतर सामाजीक काम करीत प्रगती करु लागलो ....आमच्या व्यावसायिक जीवनात आम्ही यशस्वी होत असताना धाकटे बंधु यानी व्यवसाय जपत बागायती शेती केली .. मोठे बंधु बारामती सराफ असोसिएशन अध्यक्ष, राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन उपाध्यक्ष ,मी पत्रकारीता करीत करीत जिल्हा न्यायाधीश व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे मा अध्यक्ष ॲड सूधाकर आव्हाड सर यानी प्रकाशीत केलेले दैनंदीन जीवनातील कायदे ,नवनवीन दुरुस्त्यासह या कायदेविषयक पुस्तकाचा लेखक बनलो .. .. पुढे वकिलीमधे देखील यशस्वी कारकिर्द करीत अनेकाना कोट्यावधीच्या जमीनी मिळवुन दिल्या.... अपघात ग्रस्तांच्या वारसाना कोट्यावधी रुपये मिळवुन दिले... अनेकांचे विस्कळित संसार जुळवुन दिले .... नोटरी भारत सरकार ,शासकीय विश्वस्त- सोमेश्वर देवस्थान .. पत्रकार संघाचे अध्यक्षपद सैनिक संघटना संस्थापक. व तक्रार निवारण समिती अध्यक्ष ... अशी पदे मिळाली .. प्रत्येक पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तीन ही भावंडे आपापल्या क्षेत्रात व पारंपारिक व्यवसायात चिकाटी व सचोटी ने यशस्वी आहोत मात्र त्या झोपडीची आठवण आजही कायम आहे ..
आमच्या या यशात आई वडीलांच्या पुण्याई बरोबर त्यांच्या संस्काराचा फार मोठा हातभार आहे त्यानी दिलेली कष्टावर निष्ठा व शिक्षणावर भरोसा या बाबीमुळे आज निश्चीत समाधानी आयुष्य जगत आहोत व त्यांची स्वप्ने पुरी करीत आहोत ... आज वडीलांच्या ३० व्या पुण्यस्मरणानिमित्त हिच आठवणींची पुष्पांजली अर्पण करतो तुम्हाला ..
( ॲड गणेश आळंदीकर ,सोमेश्वरनगर )
(ता .. बारामती... जि पुणे .. )
.