इजिनिअर वडेवाला बनलाय आंबेवाला तर महिन्यात केली आठ लाखाची विक्री
विशेष बातमी
कोरोना आला तस गेल्या वर्षा पासून व्यावसायिक अडचणीत आले. रुग्ण संख्या वाढल्याने लॉकडाऊन लागल्याने छोटे मोठे व्यावसायिक अडचणीत आले. दुकानात सगळा माल पडून राहिल्याने आर्थिक संकट वाढले. परंतु अश्या संकटात व्यवसाय करणा-या एका बहाद्दराने नामी शक्कल लढवली. त्यांन लोकांची मागणी लक्षात घेता. आंबे विकण्याचा निर्णय घेतला. अगोदर इंजिनिअरिंग वडेवाले म्हणून तो वडे विकू लागला होता. त्यानं डिप्लोमा मकेनिकल मधून डिप्लोमा केला.पण नोकरी न करता चार चाकी गाडी घेऊन त्यावर इजिनिअर वडेवाले म्हणून इंजिनिअर वडेवाला झाला. लोकांनी कोरोना काळात वाफ घेतल्याने कोरोना जातो म्हनून वाफेची मशीन घेतल्या. ह्या गड्याने त्या पण विकल्या.उन्हाळा सुरू झाला कलिंगड विकले. प्रवासात लोक रसवंती गृह दिसले की उसाचा रस घ्यायला थांबतील म्हणून विचार केला अन ते पण सुरू केलं. संधीच सोन करणं यालाच तर म्हणतात. कोरोणा लोकांचे व्यवसाय हातावरची पोट पार देशोधडीला लागली. पण यांने जास्त वेगळं नाही पण तब्बल आठ लाखांचे आंबे विकले. अक्षय शिंगाडे या तरुणाने स्व हनुमंराव सावंत यांच्या समरणार्थ आंबा महोत्सव सुरू केला. महिन्या भरात मिळालेला प्रतिसाद बघता आठ लाख रुपयांच्या आंबाची विक्री केली. वाघळवाडीत उत्कर्ष आश्रम शाळेच्या ठिकाणी आंबा मिळतोय. हे सोमेश्वरनगर परिसरात कळत गेलं अन नकळत त्याची चर्चा सर्वत्र झाली. येता-जाता गाड्यावरून जाणारे प्रवासी सुद्धा याचे ग्राहक बनले .नागपूर, सातारा, पुणे, फलटण सोलापूर या ठिकाणच्या ग्राहकाच्या पसंतीस त्याचा आंबा उतरला. अशी आहे छोट्या उदयोगाची मोठी कहाणी.