बार्शी च्या ग्रामदैवत श्री भगवंत मंदिरात द्वादशीला श्री भगवंत जन्मसोहळा साजरा...
विशेष प्रतिनिधी
या विषयी अधिक माहिती अशी , तीर्थक्षेत्र पंढरपूर च्या एकादशी नंतर द्वादशीला बार्शी च्या श्री भगवंताचे दर्शनाचे प्राचीन काळापासून खूप मोठे महत्व आहे . भगवंत नगरी बार्शीतील हे ग्रामदैवत श्री भगवंताचे मंदिर अंदाजे ई सन 1245 मध्ये हेमाडपंथी कला शैलीत बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. राजा आंबरीष च्या रक्षणासाठी साक्षात श्री विष्णूने लक्ष्मीसह ""भगवंत"" या नावाने येथे अवतार घेतल्याचा पुराणात उल्लेख आहे या मंदिराच्या गाभाऱ्यासमोर गरूड खांब आहे नक्षीदार कलाकुसर असलेल्या मंदिराचा सभामंडप सुमारे दोनशे वर्षा पूर्वीचा असावा असा अभ्यासकांचा कयास आहे याच मंदिर परिसरात श्री गुरुदेव दत्त,श्री गणेश,श्री विठ्ठल रुक्मिणी,श्री हनुमान, आदी देवतांचे मूर्ती व छोटेछोटे मंदिरे आहेत सोळा खांबी मंदिर आणि गरुड खांब मंदिराचे आध्यत्मिक आणि प्राचीन महत्व अधोरेखित करते .संपूर्ण आशिया खंडातील हेमाड या पाषाण मधील कोरलेले एकमेव मंदिर आहे या मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार पूर्वमुखी आहे श्री भगवंतांची मूर्ती काळ्या पाषाणाची असून भगवंताच्या हातात शंख,चक्र व गदा आहेत श्री लक्ष्मी भगवंताच्या पाठीशी आहे तर राजा आंबरीष मूर्ती भगवंतांच्या उजव्या हाताशी चरणाजवल आहे भगवंताच्या कपाळावर शिवलिंग असून छातीवर भृगू ऋषींचे पायचे ठसे आहेत या मंदिराला श्री नानासाहेब पेशवे यांच्याकडून 1760 साली ,इस्ट इंडिया कंपनीकडून 1823 साली व ब्रिटिश सरकारकडून 1784 मध्ये इनाम मिळाल्याचे इतिहासात नोंदी आहेत मंदिराची संपूर्ण देखभाल पंच कमिटी मार्फत केली जाते मंदिरातील नित्य सेवा बडवे कुटुंबाकडून केली जाते या नित्य सेवेमध्ये पहाटे काकडा आरती,पूजा महापूजा , दुपारी नेवेद्य, संध्याकाळी धूपआरती ,विडा, रात्री शेजारती,संपन्न होते. एकूण 17 पुजारी बडवे कुटुंब या मंदिराजवळील परिसरात राहत असून सध्या सुमारे सातवी त्ये आठवी पिढी भगवंताच्या या पूजा कार्यात कार्यरत आहे.चैत्र,मार्गशीर्ष ,आषाढ व कार्तिक एकादशी द्वादशी ला भक्तांची या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असते.कार्तिक आणि आषाढी पौर्णिमेस संध्याकाळी सात वाजता छबिना काढला जातो तर कार्तिक आणि आषाढ एकादशीला नागरप्रदक्षिणा काढली जाते.यासह वर्षभरात विविध सण उत्सव जसे की दर चतुर्थी विशेष पूजा,पंधरा ऑगस्ट, सविष जानेवारी विशिष्ट पोशाख सजावट पूजा ,नवरात्र उत्सव,तुकाराम बीज, दत्त जन्म सोहळा,श्रावणातील उत्सव,श्री कृष्ण जन्म सोहळा,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्री भगवंत जन्म सोहळा यासाठी आणि परंपरे नुसार चंदन उटी लेप आणि वर्षभर विविध प्रकारे अत्यंत मनोभावे आकर्षक पोशाख व सजावट करून पूजा आणि इतर उपक्रम यशस्वीतेसाठी योगेश बडवे,कैलाश बडवे हे वकील बंधू सह भगवंत(सुशांत) बडवे,संदीप बडवे,निलेश बडवे,मनोज बडवे,सतीश बडवे आदी बडवे परिवारातील सदस्य विशेष परिश्रम घेत असतात. 🟫बार्शी ची भूमी ही भगवंताच्या शाश्वत सानिध्याने पवित्र क्षेत्र आहे.धार्मिक स्थळांचा विचार करता बार्शी नंतर अनेक स्थळांचा विकास झाला मार्केटिंग झाले मात्र म्हणावे तसे बार्शी भगवंत नगरीचे हवे तेवढे मार्केटिंग न झाल्याने सर्वांगीण तीर्थक्षेत्र विकासकामे होण्यास पाहिजे तेवढी झाली नाहीत मंदिराचे वैभव जतन करण्यासाठी पंच कमिटी आटोकाट प्रयत्न करत आहे. लोकसहभागातून पंच कमिटी उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार चे काम करीत आहे.या तीर्थक्षेत्र चा सर्वांगीण विकासासाठी शासनाने वेळोवेळी भरीव मदत देने गरजेचे आहे.