बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत मौजे वाकी ता.बारामती जि.पुणे या गावचे हृदीतील त्रिमुर्ती डेअरी फॉर्मचे आवारातून दिनांक ०६/०५/२०२१ रोजी रात्रौ ११:०० वाचे सुमारास जॉनडियर कंपनीचा हिरव्या रंगाचा ५०४५ डी मॉडेल चा ट्रॅक्टर सह दोन ट्रॉली असा ४२५००० /-रू चा मुददेमाल चोरौला चोरी करून नेले बाबत श्री अभिजीत अशोक बालगुडे वय ३२ वर्षे धंदा मॅनेजर त्रिमुर्ती डेअरी फॉर्म वाकी सध्या रा वाकी मुळ रा.वाणेवाडी ता.बारामती जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन वडगाव निबाळकर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता.
सदर गुन्हयाचे तपासात चोरीस गेलेला मुद्देमाल संशयीत आरोपी नामे अंकुश संतोश सरदड रा देवपुर ता.दुधा जि. बुलढाणा याने चोरुन नेले असलेची शक्यता असलेने तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या आधारे संशयित आरोपी हा त्याचे मुळगाव देवपुर ता. दुधा जि. बुलढाणा असे असल्याचे माहीती मिळाल्याने तात्काळ संशयित आरोपीच्या घरी जावुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने जॉनडियर कंपनीचा द्रक्टर सह दोन ट्रॉली वाकी ता बारामती जि पुणे येथुन चोरून आणल्याचे कबुल केलेने तरी आरोपी नामे अंकुश संतोष सरदड वय २४ रा देवपुर ता दुधा जि बुलढाणा याला सदर गुन्हयातील गेला माल जॉनडियर कंपनीचा ५०४५ डी मॉडेल चा ट्रॅक्टर सह दोन ट्रॉली असा ४२५००० / -रू चा मुददेमाल जप्त करुन अटक करण्यात आलेली आहे . सदरची कामगिरी ही मा डॉ अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, श्री मिलिंद मोहिते सो आपर पोलीस अधीक्षक , बारामती उपविभाग बारामती, श्री नारायण शिरगावकर उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती, तसेच श्री.पदमाकर घनवट सो. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी स.पो.नि श्री सोमनाथ लाडे तसेच पोलीस अंमलदार स.फो बाळासाहेब खोमणे पो.ना बाळासाहेब पानसरे, पो.शि.अक्षय सिताप, तौसिफ मनेरी, होमगार्ड अजय नलवडे यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास स.फौ.बाळासाहेब खोमणे हे करीत आहेत कळावे