Type Here to Get Search Results !

लॉकडाऊनमुळे नाभिक व्यावसायिक बेरोजगारीच्या कैचीत

लॉकडाऊनमुळे नाभिक व्यावसायिक बेरोजगारीच्या कैचीत

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

सध्या सर्वत्र लॉकडाऊनमुळे बहुतेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाले असुन याचा फटका केशकर्तनालय (सलुन) व्यावसायीकांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. नाभिक समाजाचे उपजिवीकेचे मुख्य साधन असलेला सलुन व्यवसाय अनेक दिवस लॉकडाऊनमुळे बंद असल्याने अनेक नाभिक कारागीर आर्थिक अडचनीत सापडले आहेत. कोरोना प्रादूर्भावामुळे गतसाली काही महीने व यावर्षी केशकर्तनालये बंद राहील्याने या कुटूंबांची आर्थिक घडी विस्कटीत झाली आहे. या नाभिक कारागिरांपैकी बहूतांशी कारागिरांची केस,दाढी करण्याची दूकाने ही भाडोत्री गाळ्यामध्ये आहे. लॉकडाऊनमुळे या गाळ्यांचे भाडे तसेच विजबील कसे भरावे हा प्रश्न नाभिक व्यावसायिकांसमोर उभा ठाकला आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन नंतर काही महीने सलुन उघडली गेली मात्र कोरोनाच्या भीतीने ग्राहक घरीच केस,दाढी करणे पसंत करत असल्याने जेमतेमच ग्राहक सलुन मध्ये येत होते यामुळे काही काळ सलुन सुरु झाले मात्र कमाई म्हणावी अशी न झाल्याने कोरोनाचा मोठा फटका नाभिक व्यावसायिकांना बसला होता. त्यातच कोरोनाच्या दूस-या लाटेमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये हा व्यवसाय पुर्णपणे ठप्प झाला आहे. नाभिक समाज हा बहूतांशी केशकर्तनालयाच्या व्यावसायावर अवलंबून आहे. अशातच लॉकडाऊनमुळे हे कारागीर व त्यांचे कुटूंब बेरोजगारीच्या कात्रीत अडकल्याने आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह व ईतर खर्च कसा चालवावा या विवंचनेत नाभिक व्यावसायिक सापडला आहे. यातच ब-याच नाभिक व्यावसायिकांना घेतलेल्या कर्जाचे व ईतर हप्ते भरावे लागतात. हप्ते चूकल्यास त्याचा दंड व व्याज वाढत जात आहे लॉकडाऊन असले तरी फायनांस कंपण्या व बँकांचे कर्जाच्या हप्ते बंद नाहीत ते भरावेच लागत आहेत.वाढलेल्या महागाईचा भस्मासुर व विस्कटलेली आर्थीक घडी यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होऊन बसले आहे. सलग दूस-या वर्षीच्या या लॉकडाऊनने व्यावसायिक, नवव्यावसायिकांचे कंबरडे मोडले असुन सरकारने नाभिक व्यावसायिकांकडे लक्ष देत काही मदत जाहीर करुन नीधी उपलब्ध करुण नाभिक व्यावसायिकांनाआधार द्यावा अशी आशा अनेक नाभिक व्यावसायिक व त्यांच्या कुटूंबियांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी नाभिक संघटनांनी यापुर्वी शासनाकडे याबाबत तशी मागणी केलेली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे हतबल झालेले नाभिक व्यावसायिक केशकर्तनालये कधी सुरु होतात  व शासन कधी मदत जाहीर करनार या प्रतिक्षेत आहेत

नाभिक समाजाला दुसरा कोणताही उत्पन्नाचा मार्ग नसुन अनेकांची भाडोत्री दुकाने आहेत,त्यांचे भाडे भरणे मुश्किल आहे.गेल्या वर्षी पाच महिने दुकाने बंद राहीली,याही वर्षी तीच परिस्थिती त्यामुळे हा रोजंदारीचा व्यवसाय अडचणीत असुन शासनाकडुन आमच्या समाजाला काहीतरी  मदत मिळायला हवी.गेल्यावर्षी कर्नाटक सरकारने बारा बलुतेदारांना पाच हजार रुपयेची मदत केली होती,तशी इकडेही आम्हाला मदत मिळायला हवी.
- पांडुरंग पवार,नाभिक संघटनेचे अध्यक्ष

---------------------------------------------------------;
लॉकडाऊन हटवतांना सरकारने नाभिक व्यावसायिकांचाही विचार करावा. नाभिक व्यावसायिक मेटाकूटीला आला आहे. शासनाच्या नियमांचे पालन करुन व योग्य ती सर्व काळजी घेऊन आम्ही सेवा देवू.

- सुनिल जाधव, द लुक मेन्स पार्लर सोमेश्वरनगर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test