महत्वाची बातमी; फ्रंटलाईन वर्कर , हेल्थ केअर वर्कर, सिनियर सिटीझन यांचे दुसऱ्या डोसचे होणार लसीकरण..
बुधवार दिनांक 19/05/2021 साठी जिल्हा स्तरावरून कोव्हिशील्ड/ कॉवक्सिन लस पुरवठा झाला आहे. यामध्ये फक्त frontline वर्कर,हेल्थ केअर वर्कर, सिनियर सिटीझन यांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण करावे ( कॉविशिल्ड चा पहिला डोस घेवुन 84 दिवस पुर्ण झालेले व कॉवक्सिनचा डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेले).सदरचे लसीकरण महिला हॉस्पिटल बारामती(450डोसेस) व प्रा आ के सांगवी(350डोसेस) या ठिकाणीच होणार आहे .तरी पात्र लाभार्थीना सूचित करून लसीकरण यशस्वी करणेत यावे.
लाभार्थींची गैरसोय होणार नाही यासाठी स्थानिक प्रसिध्दी यावी.
आरोग्य विभाग
पंचायत समिती बारामती