राज्य उत्पादन शुल्क विभागाची घाडगेवाडी,
झारगडवाडी ता. बारामती जि. पुणे येथे धड़क कारवाई
बारामती प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारामती तालुक्यातील घाडगेवाडी व झारगडवाडी येथे अवैध देशी दारू,गावठी दारू विक्री निर्मिती केंद्रावर छापे टाकूण धडक कारवाई केली .यामध्ये एकूण पाच व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पैकी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहेत .सदर ठिकाणी ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याचा नाश करण्यात आला .
आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने बारामती तालुक्यातील घाडगेवाडी , झारगडवाडी येथे अवैध हातभट्टी व देशी दारु विक्री होत असल्याची माहीती मिळाल्यानंतर येथे धड्क कार्यवाही केली . या कार्यवाही सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप-आयुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक संतोष झगडे , उप अधीक्षक संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विजय मनाळे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक डी.बी.पाटील, दुय्यम निरीक्षक सागर एस.भगत , पी. एन. कदम , विकास थोरात, सहाय्यक दुय्यम निरीक्षक डी. के . पाटील तसेच या कारवाईत, महिला जवान निलम धुमाळ, विजय विंचुरकर, अशोक पाटील, दत्तात्रय साळुंके, रसुल कादरी, झारगडवाडीचे सरपंच नितीन शेडगे उप सरपंच वैष्णव बळी यांनी सहभाग घेतला होता .
यामध्ये एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी गणेश शिवाजी जाधव रा. झारगडवाडी ता. बारामती जि पुणे , नशीब अजिनाथ भोसले रा.झारगडवाडी ता.बारामती जि. पुणे यांना ताब्यात घेतले आहे . आरोपीकडुन गावठी दारु तयार करण्यासाठी रसायण ३६०० लिटर , गावठी हातभट्टी दारू २२२ लिटर , देशी दारू १०.१ ब.लि. असा एकूण ९६०२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्काच्या या कार्यवाहीमुळे महीलावर्गाकडुन समाधान व्यक्त करण्यात आले आहे .