पिंपळीत लग्नवाढदिवसानिमित्त युवकाचा अभिनव उपक्रम
बारामती प्रतिनिधी
पिंपळी येथील युवा उद्योजक नितिन दादासाहेब केसकर यांनी लग्नवाढदिवसाचे औचित्य साधून पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीस सॅनिटायझर मशीन भेट दिली.
ते नेहमीच कार्यात हातभार लावत असतात. यापूर्वी देखील त्यांनी सामाजिक बांधिलकी जप्त अनेक ठिकाणी लोकोपयोगी वस्तूंचे वाटप केले आहे.
यावेळी छत्रपती कारखाना भवानीनगर संचालक संतोष ढवाण पाटील,
सरपंच मंगल हरिभाऊ केसकर, बारामती तालुका संजयगांधी निराधार योजना समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, उपसरपंच राहूल बनकर,ग्रा.सदस्य आबासो देवकाते पाटील,ग्रा.सदस्य अजित थोरात,सामाजिक कार्यकर्ते अशोकराव ढवाण पाटील,बाळासो केसकर, ग्रामस्थ बापू केसकर,पोपट बाबर,अमोल केसकर,सचिन देवकाते आदी उपस्थित होते.
छत्रपती सहकारी कारखान्याचे संचालक संतोष ढवाण पाटील यांनी नितीन केसकर यांच्या कार्याचे कौतुक करून उपस्थितांच्या वतीने उभयतांना शुभेच्छा दिल्या.
व ग्रामपंचायतीच्या वतीने आभार हरिभाऊ केसकर यांनी मानले.